मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

संतापजनक! नशेद धुंद होती आई; दीड महिन्याच्या चिमुकलीचा भुकेनं मृत्यू, मृतदेहाशेजारी दारू पित बसली

संतापजनक! नशेद धुंद होती आई; दीड महिन्याच्या चिमुकलीचा भुकेनं मृत्यू, मृतदेहाशेजारी दारू पित बसली

आईच्या दारु पिण्याच्या (Intoxicated Mother) सवयीमुळे एका दीड महिन्याच्या निष्पाप मुलाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रभर दुधासाठी रडणाऱ्या या चिमुकलीनं अखेर दम तोडला (Girl Dies of Hunger).

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 28 मार्च : आईच्या दारू पिण्याच्या (Intoxicated Mother) सवयीमुळे एका दीड महिन्याच्या निष्पाप मुलीचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना आहे, छत्तीसगडच्या धमतरीमध्ये. चिमुकलीच्या रडण्याणही नशेत धुंद आई झोपेतून उठली नाही. रात्रभर दुधासाठी रडणाऱ्या या चिमुकलीनं अखेर दम तोडला (Girl Dies of Hunger) . मात्र, या निर्दयी आईला मुलीच्या मृत्यूचाही तपास लागला नाही. तिनं सकाळी उठून पुन्हा दारू पिली आणि ती झोपून गेली.

काही वेळानं शेजाऱ्यांना शंका आल्यानंतर त्यांनी महिलेच्या घरामध्ये पाहिलं. नशेत धुंद आई आणि मृत बाळ पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांनी फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीच्या तपासाचून समोर आलेल्या माहितीनुसार भुकेनं या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे प्रकरण धमतरीच्या सुंदरगंज वार्डमधील आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं नाव राजमीत कौर असं आहे. तिचा पती हरमीत मोटर मनॅनिक आहे. राजमीतनं नुकतंच एका मुलीला जन्म दिला होता. स्थानिक लोकांनी सांगितलं, की ही महिला दिवसरात्र दारु प्यायची. ती नेहमी नशेतच असायची. सध्या तिचा पती काही कामानिमित्त शहरातून बाहेर गेला होता. तेव्हाच शुक्रवारी रात्री राजमीतनं खूप दारु प्यायली. नशेत धुंद असलेल्या या महिलेचा डोळा कधी लागला हे तिलाच समजलं नाही. यादरम्यान ती आपल्या मुलीशेजारीच झोपली होती.

नशेद धुंद या महिलेला आपल्या बाळाचीही काळजी नव्हती. ही मुलगी भुकेनं रात्रभर रडत राहिली मात्र आई झोपेतही होती. यानंतर भुकेनं तडपून या मुलीचा मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे धमतरीच्या सुंदरगंज परिसरात लोकही हैराण आहेत. एका आईच्या मनात एकदाही आपल्या चिमुकल्या निष्पाप मुलीचा विचार कसा आला नसेल, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका बाजूला मुलीचा मृतदेह पडला होता तर दुसरीकडे तिची आई बेधुंद अवस्थेत होती. पोलिसांनी सांगितलं, की महिला इतकी नशेत होती की तिला काही बोलताही येत नव्हतं. नंतर जेव्हा तिचा पती घरी पोहोचला तेव्हा तोदेखील नशेतच होता.

First published:

Tags: Alcohol, Baby died, Crime