जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोलमजुरी करून जगणाऱ्या वृद्धाला दिली अमानुष शिक्षा; चाकुने वार करत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात, कारण समोर

मोलमजुरी करून जगणाऱ्या वृद्धाला दिली अमानुष शिक्षा; चाकुने वार करत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात, कारण समोर

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Yavatmal: यवतमाळ शहरालगत असणाऱ्या वाघाडी याठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तीन जणांनी एका मोलमजुरी करणाऱ्या वयोवृद्धाची चाकुने सपासप वार (Attack with knife) करत निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 13 फेब्रुवारी: यवतमाळ (Yavatmal) शहरालगत असणाऱ्या वाघाडी याठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तीन जणांनी एका मोलमजुरी करणाऱ्या वयोवृद्धाची चाकुने सपासप वार  (Attack with knife) करत निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे.  हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींसह अन्य एकाला अटक (3 accused arrested including 2 minor) केली आहे. संबंधित तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. लक्ष्मण मसू जाधव असं हत्या झालेल्या वयोवृद्धाचं नाव आहे. ते यवतमाळ शहरालगत असणाऱ्या वाघाडी गावातील रहिवासी होते. ते गावात मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह चालवत होते. पण त्यांनी शेजारी राहणाऱ्या शेळके कुटुंबीयांवर जादूटोणा केल्याचा संशय (suspicion of black magic) त्यांच्यावर होता. तसेच काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृत्यूमागे मृत लक्ष्मण जाधव यांचा हात असावा. तसेच त्यांनी जादूटोणा केल्यानेच दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हेही वाचा- Mumbai: धारावीत दिवसाढवळ्या रक्तपात; दबा धरून बसलेल्या दोघांकडून तरुणावर अंदाधुंद गोळीबार याच कारणातून गावातील अभय नैताम आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदाराने लक्ष्मण जाधव यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वयोवृद्धाची झालेली अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. हेही वाचा- मतिमंद तरुणीसोबत नराधमाने गाठला विकृतीचा कळस, 5 महिन्यांपासून देत होता नरक यातना पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये दोन अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे. अभय नैताम असं अटक केलेल्या सज्ञान आरोपीचं नाव आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात