मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नर्सिंगची विद्यार्थिनीला मित्रांनी आधी पाजली दारू, मग मैत्रिणीसोबत केलं भयानक कांड

नर्सिंगची विद्यार्थिनीला मित्रांनी आधी पाजली दारू, मग मैत्रिणीसोबत केलं भयानक कांड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मैत्रीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India

कोझिकोड, 21 फेब्रुवारी : केरळमधील कोझिकोडमधून एक क्रूर घटना समोर आली आहे. याठिकाणी नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर तिच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटना शनिवारी 18 फेब्रुवारीच्या रात्री घडली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या दोन मित्रांनी तिला आधी दारू पिण्यास सांगितले. पण तिने तसे करण्यास नकार दिल्याने त्यांनी तिला दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी काहीशा अडचणीत असल्याचे कॉलेज अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यासाठी समुपदेशन सत्र आयोजित केले. यामध्ये विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला. विद्यार्थिनीच्या खुलाशाच्या आधारे कोझिकोड येथील कसाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

ही विद्यार्थिनी केरळमधील एर्नाकुलमची रहिवासी असून ती सध्या नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. दोन्ही आरोपी तिचे वर्गमित्र असून तिच्यासोबतच नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, दोन्ही आरोपींनी तिला त्यांच्या भाड्याच्या घरात पार्टीसाठी बोलावले होते. त्यानंतर आरोपीने विद्यार्थिनीला दारू पाजण्यास भाग पाडले आणि ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा - अफेअर, पैसा अन् मर्डर...पत्नीला हवा प्रियकर, लेक पैशांचा भुकेला; दोघांनी रचला भयंकर कट

घटनेनंतर आरोपीने नर्सिंगच्या या विद्यार्थिनीला घरी एकटी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. काही तासांनंतर विद्यार्थिनीला शुद्ध आल्यावर तिने मित्राला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्या मित्राने त्याला तेथून बाहेर काढण्यासाठी मदत केली. याप्रकरणी कोझिकोड येथील कसाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Crime news, Kerala, Rape news, Sexual assault, Sexual harrasment