जयपूर, 30 एप्रिल : राजस्थानमधील (Rajasthan News) जोधपुरच्या प्रतिष्ठित उम्मेद क्लबमध्ये एका अल्पवयीन मुलीचा अंघोळ करीत असताना आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट केल्याने खळबळ उडाली आहे. यासंबंधित उदय मंदिर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ शूट करणारे आरोपी आणि उम्मेद क्लब व्यवस्थापनाच्या चार पदाधिकाऱ्यांसह समझोत्यासाठी दबाव आणणाऱ्या अन्य एकावर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या घटनेमुळे धक्का बसलेल्या अल्पवयीन मुलाने खाणेपिणे सोडले आहे. ‘माझा व्हिडिओ बनवला आहे, आता काय होईल’; असच ती म्हणत असते. पीडितेच्या आईने सांगितलं की, मुलीला धक्का बसला… या प्रकरणात पीडितेच्या आईने सांगितलं की, मुलगी 6 रात्रीपासून झोपलेली नाही आणि जेवलीही नाही. रात्रभर रडत असते. माझा व्हिडीओ शूट केला, आता पुढे काय होईल. माझी मुलगी कधी स्वीमिंगसाठी जात नाही. एक आठवड्यापासून मला म्हणत होती, म्हणून मी हो म्हणाले. ती पहिल्यांदा आपल्या फ्रेंड्ससोबत गेली होती. तिची मैत्रिण उम्मेद क्लबची सदस्य आहे. मुलगा नळावर उभा राहून खड्ड्यात मोबाइल फिट करून व्हिडीओ शूट करीत होता. हे ही वाचा- पोलिसाने ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या महिलेकडून करून घेतली मसाज; संतापजनक VIDEO
मुलीने जेव्हा गोंधळ उडाला तर गर्दी जमा झाली आणि आकाश चोप्राला पकडलं. क्लब मॅनेजमेंटने आकाशकडून फोन घेतला आणि फोन परत करण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाला व्हिडीओ डिलिट झाल्याचं सांगितलं. मात्र फोन त्यांनी दिला नाही. व्हिडीओ कदाचित दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड केला असू शकतो. दुसऱ्या दिवशी मुलाला फोन दिला. दुस-या दिवशी क्लबच्या व्यवस्थापनाने आम्हालाच उलट सवाल केला. पीडितेची आई म्हणाली की, मी पोलीस कमिश्नर आणि डिसीपींना एफआयआरची कॉपी दिली आहे. मला न्यायाची प्रतीक्षा आहे.
पीडिता म्हणाली… 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिलच्या सायंकाळी मैत्रिणीसह उम्मेद क्लबमध्ये स्वीमिंग करण्यासाठी गेली होती. स्वीमिंगनंतर शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तेथे कपडे बदलताना वर पाहिलं तर मोबाइल कॅमेऱ्याचा अॅगल तिच्या दिशेने होता. यानंतर मुलगी बाहेर आली आणि तिने आकाश चोप्रा याला बाथरूममधून बाहेर येताना पाहिलं आणि तो मोबाइल लपवत होता. यानंतर हा प्रकार सर्वांसमोर आला.

)







