Home /News /crime /

धक्कादायक! घरात शौचालय नसल्यामुळे नवविवाहितेची आत्महत्या, केला होता प्रेमविवाह

धक्कादायक! घरात शौचालय नसल्यामुळे नवविवाहितेची आत्महत्या, केला होता प्रेमविवाह

तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील एका 27 वर्षीय महिलेने पतीच्या घरी शौचालय (Toilet) नसल्यामुळे आत्महत्या केली. रम्या असे आत्महत्या (Woman Suicide) केलेल्या महिलेचे नाव आहे.

  कुड्डालोर, 11 मे : तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील एका 27 वर्षीय महिलेने पतीच्या घरी शौचालय (Toilet) नसल्यामुळे आत्महत्या केली. रम्या असे आत्महत्या (Woman Suicide) केलेल्या महिलेचे नाव आहे. कुड्डालोर जिल्ह्यातील अरिसिपेरियनकुप्पम गावातील रहिवासी असलेल्या आणि एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) काम करणाऱ्या रम्याने 6 एप्रिल रोजी कार्तिकेयनशी लग्न केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या घरात शौचालय नसल्याने रम्या लग्नानंतर तिच्या आईसोबत राहू लागली होती. तिने पतीला राज्याच्या राजधानीपासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या कुड्डालोर शहरात शौचालय असलेले घर शोधण्यास सांगितले होते. यावरुन त्यांच्यात वादही झाला होता. यानंतर सोमवारी रम्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, रम्याला कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. यानंतर तिला पुडुचेरीच्या जवाहरलाल इन्स्टीट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एजुकेशन अॅन्ड रिसर्च (JIPMER) इथे घेऊन जाण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानतंर रम्याच्या आई मंजुला यांनी तिरुपतिरुपुलियुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याआधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हे वाचा - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलचे भांडण विकोपाला, प्रियकराने प्रेयसीलाच संपवलं!
  एपीबी नाडूने दिलेल्या अहवालानुसार, कुड्डालोर जिल्ह्यातील अरिसिपेरियनकुप्पम येथून एमएससी केलेल्या रम्या एक खासगी मेडिकल फर्म येथे काम करत होती. रम्या आणि तिचा पती दोन वर्षांहून अधिक काळापासून संपर्कात होते. यानंतर त्या दोघांनी 6 एप्रिलला आपल्या आई-वडिलांच्या इच्छेने लग्न केले. रम्याने पतीच्या घरी आल्यानंतर तिथे शौचालय नाही, असे तिला कळाले. यानंतर लग्नाच्या एका आठवड्याने ती तिच्या आईच्या घरी चालली गेली. शौचालय बनवले गेल्यावरच ती घरी परत येईल असे तिने सांगितले होते. कार्तिकेयनने शौचालयाचे काम सुरू केले होते. मात्र, 6 मे रोजी तिने आत्महत्या केली. दोन वर्षांच्या प्रेमानंतर रम्या आणि कार्तिकेयनने लग्न केले होते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Tamilnadu, Woman suicide

  पुढील बातम्या