जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'हॅलो बाबा...सासरी वीज नाहीये, माहेरी बोलावून घ्या प्लीज'; नववधुंनी ठोकली धूम

'हॅलो बाबा...सासरी वीज नाहीये, माहेरी बोलावून घ्या प्लीज'; नववधुंनी ठोकली धूम

'हॅलो बाबा...सासरी वीज नाहीये, माहेरी बोलावून घ्या प्लीज'; नववधुंनी ठोकली धूम

20 दिवसांपूर्वीच लग्न करून नववधू सासरी आल्या होत्या. मात्र वीज नसल्यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 6 जून : सुमारे 20 दिवसांपासून सासरच्या घरात वीज (Power Cut Problem) नसलेल्या गावातील चार नववधूंनी वेळेपूर्वीच निरोप घेतला. हा किस्सा यमुनापारच्या (Uttar Pradesh News) घूरपूर येथील भिटा वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या इरादतगंज गावातील आहे. दोन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात 17 मे रोजी 25 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता. गावकऱ्यांनी हेल्प लाइन क्रमांकावर 22 मे रोजी तक्रार दाखल केली. ठरलेल्या वेळेत नवा ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नाही. गावकरी सतत ट्रान्सफॉर्मर बदलण्याची विनंती करीत होते. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नव्हता. एकामागे एक चार नवरींना वेळेपूर्वी केली पाठवणी… इरादतगंज गावात वीज ठप्प झाल्यामुळे सर्वजणं त्रस्त झाले होते. मात्र सर्वाधित त्रास नव्या नवरींना होत होता. 20 दिवसांपूर्वी या गावात लग्न करून आलेल्या 2 नवरींनी माहेरी फोन करून घरातल्यांना बोलावलं आणि वेळेआधीच पाठवणी केली. याशिवाय 8 दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या दोन नवरींनाही सहन झालं नाही आणि त्यांनी वीज नसल्याने वडिलांना बोलावलं आणि माहेरी निघून गेली. तसं पाहता लग्नाच्या काही दिवसांपर्यंत तरुणी सासरी राहत होत्या. त्याच्या काही दिवसांनंतर नवरी माहेरी जातात. मात्र वीज नसल्याने तरुणी त्रस्त झाल्या होत्या. उकाड्यामुळे हैराण झाल्यामुळे नवरी त्रस्त झाली होती. यामुळे नवऱ्याचे कुटुंबीयही संतापले होते. नवरी सासरी आल्यानंतर अनेक विधी केले जातात. मात्र वीज नसल्यामुळे कोणतेच विधी होऊ शकले नाही. विधी होण्याच्या आधीच नवरी माहेरी परतल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात