Home /News /crime /

चोरीसाठी विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलात चैन; आरोपीच्या चौकशीदरम्यान पोलिसही हैराण

चोरीसाठी विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलात चैन; आरोपीच्या चौकशीदरम्यान पोलिसही हैराण

या चोरांचं प्लानिंग पाहिलं तर तुम्हीही हैराण व्हाल...

    गाजियाबाद, 5 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गाजियाबाद येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर एका गुन्हेगाराला (Crime News) अटक केली आहे. या आरोपीच्या पायाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी देशातील प्रत्येक भागात रेकीनंतर विमानाने जाऊन चोरी करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव एनामुल शेख आहे. तो झारखंड येथील राहणारा आहे. यावेळी गँगचा प्रमुख कमरूद्दीन घटनास्थळावरुन फरार झाला. आरोपीला अटक केल्यानंतर गँगचे दोन अन्य सदस्य शवीऊल आणि मोतीउल यांच्याबाबतही माहिती मिळाली आहे. (Flight travel for theft luxury hotel stay Shocking information revealed after being handed over to police) साऊथ स्टेटपासून गोवापर्यंत चोरीच्या घटना पोलिसांकडून या तिघांचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, तो चोरी करण्यासाठी आला होता. मात्र येथे पोलिसांनी घेराव घातल्यानंतर आरोपीने फायरिंग सुरू केली. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागी. आतापर्यंत आरोपीविरोधात आंध्र प्रदेश, हैदराबादमध्ये बनावटी करन्सीशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय गँग साउथमधील अनेक राज्यांसह गोवीमध्येही चोरी केली आहे. हे ही वाचा-पगार अवघा 5 हजार आणि कोटींचं 'साम्राज्य'; सत्य समोर आल्यानंतर अधिकाराही हैराण हॉटेलमध्ये राहून करीत होता रेकी चौकशीदरम्यान एनामुलने सांगितलं की, तो नुकताच एका गँगमध्ये सामील झाला आहे. चौकीचं ठिकाण ठरल्यानंतर काही सदस्यांना तेथे पाठवलं जात होतं. ते घटनास्थळाजवळ एका हॉटेलमध्ये राहून सर्वसामान्यांप्रमाणे फिरून रेकी करीत होते. यादरम्यान काही ठिकाणी गार्डला चांगल्या कमाईचं आमिष दाखवून आपल्या बाजूने करीत होते. संपूर्ण प्लानिंग केल्यानंतर कमरुद्दीन आपल्या साथींसग फ्लाइटने गुन्हा करावयाचा त्या दिवशी पोहोचत असे आणि काम झाल्यानंतर परतत होता. त्याचे सोबती नंतर अन्य सामानासह ट्रेन किंवा अन्य पर्यायाने परतत होतं. बँक, ज्वेलरी शॉप आणि मोठ्या दुकानांमध्ये करायचे चोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक, ज्वेलरी शॉप आणि मोठ मोठ्या दुकांनाचा निशाणा बनवलं जात असे. ते त्या दुकानाच्या गार्डला आपल्या प्लानिंगमध्ये सामील करून घेत होते. याचा वापर करीत चोरी केल्यानंतर ते फरार होत असे. सध्या फरार असलेल्या या तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Theif, Uttar pardesh

    पुढील बातम्या