जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आम्ही साहिलच्या लग्नात सहभागी झालो कारण...; निक्की यादव हत्याकांडात ग्रामस्थांचा खळबळजनक दावा

आम्ही साहिलच्या लग्नात सहभागी झालो कारण...; निक्की यादव हत्याकांडात ग्रामस्थांचा खळबळजनक दावा

आम्ही साहिलच्या लग्नात सहभागी झालो कारण...; निक्की यादव हत्याकांडात ग्रामस्थांचा खळबळजनक दावा

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झालीये. दिल्लीच्या नजफगडमधील मित्रांव गावातून ही घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 15 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झालीये. दिल्लीच्या नजफगडमधील मित्रांव गावातून ही घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थ हादरून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे साहिल गहलोत असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, निक्की यादव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. साहिल आणि निक्की हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या प्रेयसिला आपलं लग्न दुसऱ्या एका महिलेसोबत ठरल्याचं सांगितलं नव्हतं. जेव्हा निक्कीला साहिलच्या लग्नाबाबत कळालं तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादातूनच आरोपीने निक्कीची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह त्याच्या ढाब्यात असलेल्या फ्रीजमध्ये ठेवला होता. मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून लग्न या घटनेबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितलं की, जेव्हा पोलीस मंगळवारी सकाळी साहिल गहलोत याचा शोध घेत गावात पोहोचले तेव्हा त्यांना घटनेबाबत माहिती मिळाली. त्याने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यामध्ये असलेल्या फ्रीजमध्ये ठेवला होता. साहिलच्या घरापासून या ढाब्याचं अंतर सातशे मीटर एवढं आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका स्थानिकाने सांगितलं की, आरोपी साहिल गहलोत याचं 10 फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. त्याने नकुताच एक ढाबा सुरू केला होता आणि आपल्या मदतीसाठी एक नोकर देखील ठेवला होता.

News18लोकमत
News18लोकमत

स्थानिकांना धक्का आणखी एक स्थानिकाने सांगितलं की, आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. 10 फेब्रुवारी रोजी साहिलचं लग्न होतं. गावातील अनेक जण या लग्नात सहभागी झाले होते. मात्र जेव्हा मंगळवारी पोलिसांनी ढाब्यावर जावून फ्रीजमधून मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा या घटनेची माहिती समोर आली. या घटनेनं सर्व गावाला धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: delhi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात