मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISISशी संबंधित एकाला अटक, संवेदनशील वस्तू जप्त

पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISISशी संबंधित एकाला अटक, संवेदनशील वस्तू जप्त

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

NIA Raid: पुणे शहरातील वानवडी परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मोठी कारवाई केली आहे. ‘इसिस’ (ISIS) या दहशवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने एका घरावर छापेमारी केली आहे.

पुणे, 10 मार्च: पुणे शहरातील वानवडी परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेनं मोठी कारवाई केली आहे. ‘इसिस’या दहशवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने एका घरावर छापेमारी (NIA raid in the connection with ISIS) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक (Suspect arrested) केली असून काही कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या (electronic devices and some documents seized) आहेत. मागील तीन दिवसांपासून एनआयएचं पथक पुण्यात तपास करत असून अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

तल्हा लियाकत खान असं अटक केलेल्या 38 वर्षीय संशयित आरोपीचं नाव असून तो पुण्यातील वानवडी परिसरात वास्तव्याला होता. आरोपी तल्हा खान याचं जागतिक दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तल्हा खान याच्या वानवडी येथील घरावर छापेमारी केली आहे. NIA च्या पथकानं तल्हा खान याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा-पबजीच्या नादात तरुणानं खरोखर 500 फूट खोल दरीत मारली उडी, नंदुरबारमधील थरारक घटना

या छापेमारीत एनआयएच्या पथकानं आरोपीच्या घरातील काही संवेदनशील कागदपत्रं आणि इलेक्ट्रॅानिक वस्तू जप्त केल्या आहेत. संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. इसिस देशभरात घातपात करण्याच्या तयारीत असल्यानं पुण्यातील विविध भागात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

हेही वाचा-विष प्राशन करताच आली आठवण; लेकरांना शेवटचं पाहण्यासाठी मातेनं केलं जीवाचं रान

देशाच्या वेगवेगळ्या भागातून एनआयएने आतापर्यत अब्दुला बासित, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीक खत्री, अब्दुर रेहमान ऊर्फ डॉ. ब्रेव्ह यांना अटक केली आहे. संबंधित सहा जणांविरोधात विरोधात एनआयएनं न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी देशात घातपात घडवण्यासाठी आणि इसिसचा प्रचार करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं आहे. तसेच घातपात करण्यासाठी आवश्यक असणारी शस्त्रं गोळा करणे आणि त्यासाठी लागणारा निधी उभा करणे, अशी विविध उद्दिष्ठे आरोपींची होती, असंही दोषारोपपत्रात म्हटलं आहे.

First published:

Tags: Crime news, ISIS, Nia, Pune