Home /News /crime /

तीन दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न, आता खावी लागतेय तुरुंगाची हवा

तीन दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न, आता खावी लागतेय तुरुंगाची हवा

दारुबंदीचा कायदा पायदळी तुडवत मित्रासोबत पार्टी करणाऱ्या इंजिनिअरला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

    पटना, 16 डिसेंबर: अवघ्या तीनच दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत (Married 3 days back) अडकलेल्या एका इंजिनिअरला (Engineer) आता पोलिसांच्या बेड्या (Police arrested) पडल्या आहेत. कायद्याचं उल्लंघन (Break the rule) करून मित्रासोबत दारू पार्टी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी इंजिनिअर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. बिहारमध्ये दारुबंदी कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहेत. मात्र आजही अनेक उच्चभ्रू कुटुंबातील आणि उच्चशिक्षित तरुण दारु पिताना आढळून येत आहेत. पोलीस अशा घटनांची टीप मिळताच घटनास्थळी जाऊन कारवाई करत आहेत. लग्नानंतर मित्राला पार्टी बिहारच्या देवांशु राज या इंजिनिअरचं तीनच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. बिहारमध्ये दारुबंदी कायदा असल्यामुळे लग्नात दारुपार्टी करता आली नाही. त्यामुळे त्याचा मित्र नाराज होता. मित्राची नाराजी दूर करण्यासाठी लग्न झाल्यावर पार्टी देण्याचं आश्वासन त्यानं दिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी त्यानं मित्रासोबत दारुपार्टी करण्याचा प्लॅन आखला. मात्र या प्लॅनची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली आणि पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला. पोलीस पोहोचले पार्टीत पटनाच्या इंदिरानगर भागातील एका घरात दोघं पार्टी करण्यात मश्गूल असतानाच पोलिसांनी तिथं धाड घातली. दोघांनाही मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी गाठलं आणि अटक केली. अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीमुळे दोघंही गांगरले आणि पोलिसांना वाटेल ती कारणं सांगू लागले. मात्र पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करत त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आणि दोघांवरही दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. हे वाचा - वधूचा डान्स पाहून खवळलं पित्त, सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया: पाहा VIDEO अनेक उच्चशिक्षितांना अटक बिहारमध्ये दारुबंदी कायदा झाला असला तरी वर्षानुवर्षं दारु पिण्याची सवय सुटत नसल्याचं चित्र आहे. बिहारमध्ये आतापर्यंत अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासारख्या उच्चशिक्षित आणि श्रीमंत व्यक्तींना दारू पिताना पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे सरकारी पातळीवर दारुबंदीसाठी जोरदार पावलं उचलली जात असताना जनतेतील काही घटकांकडून मात्र हा कायदा पायदळी तुडवला जात असल्याचं चित्र आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Crime, Illegal liquor

    पुढील बातम्या