मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुतण्याने काकाचा दिला भयावह अंत; हत्येनंतरही घरात राहिला बसून

पुतण्याने काकाचा दिला भयावह अंत; हत्येनंतरही घरात राहिला बसून

Representative Image

Representative Image

मंगळवारी रात्री उशिरा आरोपीने घरात घुसून रामकिशोर यांची हत्या केली.

  • Published by:  Meenal Gangurde

कानपुर, 8 डिसेंबर : भोगनीपुर (Kanpur News) येथील एका गावात शेतकरी रामकिशोर याची त्यांचा पुतण्या मोहितने सुऱ्याने वार करून हत्या (Murder) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा आरोपीने घरात घुसून रामकिशोर यांची हत्या केली. या कृत्यानंतर तो तेथून पळाला नाही तर घरातच राहिलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र तो बोलू शकत नसल्याचं सांगितलं जात आहे.

55 वर्षीय रामकिशोर गावातील घरात एकटेच राहत होते. ते मानसिकदृष्ट्या आजारी होते. त्यांचा मुलगा आशुतोष आणि मुलगी पूजा आपल्या मावशीकडे गजनेर येथे राहतात. मंगळवारी सायंकाळी रामकिशोर याचा पुतण्यासोबत काही गोष्टीवरुन वाद झाला. यानंतर रामकिशोरने मोहितला फटकावून काढलं.

हे ही वाचा-35 वर्षीय महिलेसोबत 67 वयाच्या पतीचे अनैसर्गिक कृत्य; अंगभर आढळल्या जखमा

आरडाओरडा ऐकून गावकरीही जमा झाले. यानंतर काही वेळाने मोहित तेथून निघून गेला. रात्री उशिरा तो पुन्हा घरी आला आणि रामकिशोर यांच्या डोक्यावर आणि पोटावर सुऱ्याने वार केले आणि त्यांची हत्या केली. बुधवारी दुपारी रामकिशोर दिसला नाही म्हणून आजूबाजूचे लोक त्याच्या घरी गेले. तेथे त्याचा मृतदेह पडला होता. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर गावकऱ्यांनी घरात बसलेल्या मोहितला ताब्यात घेतलं. इशाऱ्यातून तो आपणच काकाची हत्या केल्याचं सांगत आहे. या प्रकरणात रामकिशोर यांच्या मुलाने हत्या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder