जळगाव, 2 जुलै : कोंबडीचा पाय मोडला म्हणून जळगावच्या (Jalgaon News) यावल पोलिसात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जर तुझी कोंबडी माझ्या दारासमोर आली तर तिचं तंगडं तोडेल, अशी धमकी देणाऱ्या महिलेने शेवटी कोंबडीची तंगडी मोडली. कोंबडीचा तुटलेला पाय घेऊन त्याच अवस्थेत (Neighbors broke the chicken leg ) कोंबडीला घेऊन मालकीनीने यावल पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांसमोरही यावेळी मोठा पेज निर्माण झाला होता. शेवटी कोंबडीच्या मालकीणीच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील सिद्धार्थ नगरातील दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ वाद होता. या वादाचं कारण अगदीच शुल्लक होतं. तुझी कोंबडी माझ्या दारी येऊ देऊ नको, नाहीतर कोंबडीचा पाय मोडेल अशी धमकीच एका महिलेने आपल्या शेजारच्यांना दिली होती. शेवटी कोंबडी ती. कोंबडी शेजारच्यांच्या दारासमोर गेल्याने त्यांनी चक्क काठीने त्या कोंबडीचा पाय तोडला.
कोंबडीची मालकीणही या प्रकारामुळे संतापली. त्यांनी चक्क पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनीही हा गुन्हा दाखल केला. एका कोंबडीचा पाय मोडल्याने गुन्हा दाखल झाल्याने आता गावभरात याचीच चर्चा सुरू आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.