जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Drugs विरोधात कुत्र्यांची मोहीम, मादक पदार्थ शोधण्यास मदत करणार श्वानांचं हे खास पथक

Drugs विरोधात कुत्र्यांची मोहीम, मादक पदार्थ शोधण्यास मदत करणार श्वानांचं हे खास पथक

File Photo

File Photo

शात लवकरच राष्ट्रीय अंमली पदार्थ श्वान पथक (NDD) स्थापन केलं जाणार आहे. या पथकातील (NDD) श्नान विविध घटनास्थळी हुंगून अमली पदार्थांचा शोध घेतील. या पथकात तज्ज्ञांकडून प्रशिक्षित असलेल्या विविध जातींच्या 70 कुत्र्यांचा समावेश असेल

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 02 मार्च: पोलीस दल, तपास पथक आणि सैन्य दलामध्ये विशेष असं कुत्र्यांचं पथक (Dogs) तुम्ही पाहिलं असेल. त्यांच्या मदतीने बॉम्बचा किंवा स्फोटकाचा शोध घेतला जातो. या कुत्र्यांचं स्वतंत्र पथक असतं. या कुत्र्यांना खास प्रशिक्षणही दिलं जातं. आता विशेष प्रशिक्षण मिळाल्यानंतर श्वानांचं पथक अंमली पदार्थांचा ( National Narco Detection K9 Pool) माग काढणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, देशात लवकरच राष्ट्रीय अंमली पदार्थ श्वान पथक (NDD) स्थापन केलं जाणार आहे. या पथकातील (NDD) श्नान विविध घटनास्थळी हुंगून अमली पदार्थांचा शोध घेतील. या पथकात तज्ज्ञांकडून प्रशिक्षित असलेल्या विविध जातींच्या 70 कुत्र्यांचा समावेश असेल. हे पथक केंद्रीय गृह मंत्रालयाच्या K9 शाखा, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि दहशतवादविरोधी पथक, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांच्या सहकार्याने तयार केलं जाणार आहे. अंमली पदार्थांचे सेवन, व्यापार आणि तस्करीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत अमली पदार्थ श्वान पथकाची कल्पना मांडण्यात आली होती. ही संकल्पना एक अधिकाऱ्याने बैठकीत मांडली. या पथकात 70 कुत्रे असतील. हे देशातल्या एनसीबीच्या विविध विभागांमध्ये तैनात केले जातील, अशी माहिती पीटीआयशी बोलताना या संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. अंमली पदार्थ श्वान पथकाला विविध एजन्सी आणि राज्य सरकारांच्या ड्रग युनिट्सना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्याचा उद्देश असेल. हे वाचा- ‘त्याला घरजावई करा आणि…’; नवरा-बायको वादाच्या प्रकरणात कोर्टाचा अजब आदेश ट्रक, बंदर, विमानतळ, सीमा चौकी आणि सीमेपलीकडे जात असताना मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. अशा वेळी या पथकाची मोठी मदत होईल. भारतामध्ये अशा प्रकारचं हे पहिलंच पथक असेल, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पथकात विविध देशी आणि विदेशी जातीच्या कुत्र्यांचा समावेश असेल आणि त्यांना मारिजुआना, कोकेन, हेरॉइन, मेथामफेटामाइन, एमडीएमए आणि एक्टसी यांसारख्या अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी तैनात केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये लपवण्यात आलेले अंमली पदार्थ शोधण्यासाठी कुत्र्यांचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो. तसंच संस्थानिहाय याचे निकष वेगवेगळे असतात. काही ठिकाणी ड्रग ड्युटीसाठी कुत्रे तैनात करण्यासंदर्भात एखादी मानक कार्यप्रणालीदेखील नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. अमली पदार्थ श्वान पथकाचं लक्ष्य हे केंद्रीय निमलष्करी दल आणि एनएसजीच्या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन त्यांना राज्य आणि एजन्सीजसाठी उपलब्ध करून देणं असं आहे. या उपक्रमातून अंमली पदार्थ व्यसनाविरोधातल्या मोहिमेला चालना मिळेल. हे वाचा- 16 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचला सृष्टीचा जीव, या दुर्मीळ आजाराशी सुरू होती झुंज कुत्रा हा अतिशय हुशार (Dog Intelligence) प्राणी आहे. कुत्र्याची हुंगण्याची (Smelling Sense) क्षमता अफाट असते. तसंच बुद्धिमत्ता आणि त्यांची निष्ठा ही त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ओळख देते. विशेष गोष्ट म्हणजे कुत्र्यांची झोप फारच सावध असते. म्हणजे छोट्या आवाजानेदेखील ते जागे होतात. म्हणून तर घराच्या रक्षणाची जबाबदारी कुत्र्यावर असते. खरं तर कुत्र्यांमध्ये विविध गुण असतात. त्यांचा वैद्यकीय जगतातही उपयोग झाला आहे. आता व्यसनमुक्तीच्या मोहिमेतही कुत्रे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात