Home /News /crime /

भर रस्त्यात पळवून पळवून घातल्या गोळ्या, फिल्मी स्टाईल मर्डर पाहून गाव हादरलं

भर रस्त्यात पळवून पळवून घातल्या गोळ्या, फिल्मी स्टाईल मर्डर पाहून गाव हादरलं

या हत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

    बलिया (उत्तर प्रदेश), 12 जून : देशात लॉकडाऊनदरम्यान हत्येचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी फिल्मी स्टाईलने भर दिवसा एकाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी एका व्यक्तीला गोळ्या घालून पळ काढल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा गोळीबारामध्ये व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गोळ्या झाडल्यानंतर रस्त्यावर एका गाडीतून चोरी करून आरामात पळ काढला आहे. जुन्या एका वादामुळे तरुणाची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तर हत्या झालेला व्यक्तीवरही एका खून प्रकरणात आरोपी होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. बलियामधील रेवती पोलीस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात ही घटना घडली आहे. इथे शुक्रवारी सकाळी नारिंगगड गावात राहणाऱ्या 42 वर्षीय भूपेंद्र पटेल बाजूच्या दुर्जनपूर गावात दूध देण्यासाठी गेले होते. तिथे काही लोकांना त्यांनी पाहिलं आणि घाबरून पुन्हा पळत आपल्या गावात येत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक दोन मारेकरी हातामध्ये शस्त्रं घेऊन त्यांच्या मागे धावत होते. भूपेंद्र गावात पोहोचताच मारेकऱ्यांनी गोळीबार केला. गोळ्या लागल्यामुळे भूपेंद्र पटेल रस्त्यावर पडले. यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केला. घटना घडल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले आणि वाटेत त्यांनी एकाची व्यक्तीची कार घेऊन फरार झाले. कार मालकाला बंदूकीची भीती दाखवत त्याला कारच्या खाली ओढलं आणि गाडी घेऊन पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या