मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तुरुंगात अंथरूण घालण्यावरून कैद्यांमध्ये वाद, चमच्याने वार करून केला खून

तुरुंगात अंथरूण घालण्यावरून कैद्यांमध्ये वाद, चमच्याने वार करून केला खून

तुरुंगामध्ये रात्री झोपण्यासाठी अंथरूण कुणी घालायचं, यावरून (Murder of a prisoner by another prisoner for minor reason) सुरू झालेल्या भांडणाचा परिणाम खुनात झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

चंदिगढ, 8 ऑक्टोबर : तुरुंगामध्ये रात्री झोपण्यासाठी अंथरूण कुणी घालायचं, यावरून (Murder of a prisoner by another prisoner for minor reason) सुरू झालेल्या भांडणाचा परिणाम खुनात झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कैद्यांच्या रात्रीच्या जेवणानंतर अंथरुण (Fight over arranging bed) घालण्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. बघता बघता या वादानं हाणामारीचं (Murder after fight) स्वरूप घेतलं आणि प्रकरण खुनापर्यंत पोहोचलं.

असं सुरू झालं भांडण

पंजाबमधील चंदिगढच्या भवानीनगर रोडवर असणाऱ्या तुरुंगात दोन कैद्यांचं अंथरूण घालण्याच्या मुद्द्यावरून भांडण पेटलं होतं. सुखजिंदर सिंह उर्फ सुखा आणि सोनू यांच्यात कडाक्याचं भांडण सुरु झालं. ते भांडण सोडवण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. दोघांनाही शांत करण्यात आलं आणि वाद थांबवायला सांगण्यात आलं. हा वाद मिटला असं वाटत असतानाच अचानक सोनूनं सुखावर हल्ला केला. आपल्या हातातील टोकदार चमच्यानं त्यानं सुखाच्या छातीवर वार केले. यातील काही वार सुखाच्या हृदयापर्यंत पोहोचल्यामुळेत तो जागीच खाली कोसळला.

हॉस्पिटलमध्ये मृत घोषित

या घटनेनंतर तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीनं सुखाला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. अंथरुण घालण्याच्या किरकोळ कारणावरून कैद्यांमध्ये झालेल्या मारामारीची जोरदार चर्चा सध्या पंजाबमध्ये सुरू आहे.

हे वाचा - Love Story चा भयावह शेवट! प्रेमाचा प्रत्येक क्षण प्रेयसीसाठी ठरला मरणयातना, अखेर

दोघेही गंभीर आरोपीतल कैदी

सुखविंदर आणि सोनू हे दोन्ही कैदी एनडीपीएस कायद्यातील आरोपी होते. गंभीर गुन्ह्यांसाठी त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. मात्र तुरुंगातील वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकदा कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणं होत असतात आणि त्याचा पर्यवसात खुनी हल्ल्यात होत असतं.

पोलिसांनी आरोपी सोनूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, Prisoners