मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या, अगोदर मिळाली होती धमकी

पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या, अगोदर मिळाली होती धमकी

पाकिस्तानात एका हिंदू व्यापाऱ्याची भर कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येमागे जमीन विवादाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानात एका हिंदू व्यापाऱ्याची भर कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येमागे जमीन विवादाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानात एका हिंदू व्यापाऱ्याची भर कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येमागे जमीन विवादाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

लाहौर, 2 फेब्रुवारी: पाकिस्तानातील (Pakistan) हिंदू (HIndu) अल्पसंख्याक (Minority) समाजातील व्यापाऱ्याची (Businessman) गोळ्या झाडून (Firing) हत्या (Murder) करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील (Sindh) डाहरकी शहरात ही हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून अऩेक नागरिकांनी हत्येचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन केलं. 

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील व्यापारी सतन लाल यांची सोमवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सतन लाल यांच्या जमिनीवर कापसाची एक फॅक्टरी सुरू करण्यात येत होती. या फॅक्टरीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होता. कापसाच्या फॅक्टरीच्या शेजारीत एक पिठाची गिरणीदेखील त्यांनी तयार केली होती. त्याचंही उद्घाटन सोमवारी होत होतं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि परिसरातील अनेकजण जमले होते. त्यावेळी जोरदार गोळीबाराचे आवाज ऐकू आले.

गोळ्या घालून हत्या

अगोदर या कार्यक्रमाच्या आनंदाप्रित्यर्थ आतषबाजी म्हणून कुणीतरी गोळीबार करत असल्याचं अनेकांना वाटलं. मात्र काही क्षणांतच व्यापारी सतन लाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. अज्ञात मारेकरी गोळीबार करून घटनास्थळावरून पळून गेले. सतन लाल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या व्यापारी आणि नातेवाईकांनी रस्त्यावर येत निषेध व्यक्त केला. या भागातील वाहतूक रोखण्यात आली आणि जोरजोराने घोषणाबाजी करण्यात आली. 

हे वाचा -

काही दिवसांपूर्वी मिळाली होती धमकी

व्यापारी सतन लाल यांना काही दिवसांपूर्वीच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा देश सोडून निघून जा, अन्यथा जीवाला मुकाल, अशी धमकी मिळाल्यानंतर सतन लाल यांनी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. याशिवाय पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांकडे न्याय आणि सुरक्षा यांची मागणीही त्यांनी केली होती. मात्र तरीही त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. हत्या करून पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Business, Crime, Hindu, Murder, Pakisatan