भंडारा, 25 मार्च : उधार दिलेले 300 रुपये परत देत नसल्यामुळे लाकडी दांडयाने वार करीत एका 48 वर्षीय इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara News) शहरात घडली आहे. पैशापुढे जीवाचं महत्त्वच उरलं नसल्याचं पुन्हा या घटनेने समोर आलं आहे. 48 वर्षीय सतीश आनंदराव रामटेके असे मृतकाचे नाव असून अमन अनिल सोनेकर वय 24 वर्षे असे आरोपीचे नाव आहे. अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे. भंडारा शहरात चांदणी चौक परिसरातील इंदिरा गांधी वार्ड, कुंभार टोळी येथील दास यांच्या लेआऊटमध्ये एक इसम मृत अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच भंडारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे मुरलीधर सदाशिव मेश्राम यांच्या घराच्या कुंपनाला लागून एक व्यक्ती मृतावस्थेत पडलेला दिसून आला. त्याचवेळी मृतकचा भाऊ दिनेश आनंदराव रामटेके हा आपला भाऊ सतिश आनंदराव रामटेके असल्याचं सांगितलं. सदर प्रकरणी त्वरित कलम 174 अन्वये नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन करताच मृत सतीश आनंदराव रामटेके याच्या डोक्यावर गंभीर जखम दिसल्यावर भंडारा पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. या प्रकरणात आरोपी अमन अनिल सोनेकर याला पुढील 8 तासात अटक करण्यात आली. हे ही वाचा- जालना: शाळेत गेली पण परतलीच नाहीत; एकाच वेळी 3 शाळकरी मुलांचा हृदयद्रावक अंत आरोपीने मृतकास 300 रुपये उधार दिले होते. मात्र वारंवार मागूनही मृतक सतीश पैसे दयायला तयार नव्हता. अखेर आरोपी अमनने त्याला निर्जन ठिकाणी बोलावून वाद घालत उधारीच्या पैशाची तगादा लावाला. मात्र सतीश पैसे द्यायला तयार नसल्याने झालेल्या वाद विवादात अमनने सतीशवर लाकडी दांडयाने वार करत हत्या केल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी आरोपी अमन सोनेकर विरोधात कलम 302 ,201 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. केली असून सद्धा अमन न्यायालयीन कोठडित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.