Home /News /crime /

धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची आत्महत्या; घराच्या गॅलरीतच घेतला गळफास

धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची आत्महत्या; घराच्या गॅलरीतच घेतला गळफास

रुग्णालयात रुग्ण आल्यामुळे डॉक्टरांना कॉल केला होता, मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी..

नवी मुंबई, 23 सप्टेंबर : नवी मुंबईत सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Pediatrician Dr. Prem Pahuja commits suicide at his residence) केेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. डॉक्टर प्रेम पहूजा यांची पत्नी कल्याण येथे राहात असल्याने डॉक्टर नवी मुंबईत (Navi Mumbai News) एकटेच राहत होते. दुपारी साधारण 1 वाजता रुग्ण आला असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर प्रेम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बऱ्याच वेळ डॉक्टरांना फोन केला मात्र काहीच रिप्लाय आला नाही. हे ही वाचा-दोन मुलांचा मृत्यू; नैराश्येतून वडिलांची आत्महत्या, पुण्यातील हृदयद्रावक घटना शेवटी पोलिसांनी घरात प्रवेश केल्या नंतर डॉ प्रेम पहुजा गळफास घेतल्याचे दिसले. डॉक्टर प्रेम पहूजा हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेले नवी मुंबई परिसरात प्रचलित डॉक्टर (Famous Pediatrician) होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या (Mental Health Isssue) केली असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट (No Suicide Note Near dead body) न सापडल्याने मृत्यचे गूढ वाढले आहे. सानपाडा पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून आत्महत्येच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. त्यात एकटेपणामुळे आलेल्या मानसिक तणावातूनही आत्महत्या घडल्याचं समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर देशभरात खळबळ उडाली होती. सुशांत सिंह मानसिक तणावात असल्याचंही सांगितलं जात होतं. त्यानंतरही देशातील अनेक भागांमधून आत्महत्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime, Person suicide

पुढील बातम्या