Home /News /crime /

मुंबईच्या हायप्रोफाइल भागात मर्डर, चोरीसाठी वयस्कर महिलेला बांधून ठेवून घेतला जीव

मुंबईच्या हायप्रोफाइल भागात मर्डर, चोरीसाठी वयस्कर महिलेला बांधून ठेवून घेतला जीव

मुंबईच्या वरळी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चोरीच्या उद्देशातून एका वयस्कर महिलेची निघृण हत्या करण्यात आली आहे.

    रमाकांत तिवारी वरळी, 27 फेब्रुवारी: मुंबईच्या वरळी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चोरीच्या उद्देशातून एका वयस्कर महिलेची निघृण हत्या करण्यात आली आहे. वरळीसारख्या हायप्रोफाइल परिसरात ही घटना घडली. पोलिसांचा संशय या महिलेच्या घरातील नोकरावरच आहे कारण घटनेनंतर घरातील नोकर फरार आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या 78 वर्षीय मृत महिलेचं नाव विषणी दौलवाणी असल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं काय घडलं? शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरच हादरून गेला आहे. विषणी दौलवाणी यांची हत्या झाल्याचे समजल्यानंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. कारण चोरीच्या उद्देशातून हे भयंकर कृत्य घडलं आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. याठिकाणी त्यांना ही वृद्ध महिला जखमी अवस्थेथ आढळून आली. त्यांचे हात, पाय आणि तोंड दोरीने बांधण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णायलामध्ये दाखल केलं, पण त्यांची अवस्था खूपच गंभीर होती. (हे वाचा-टी शर्ट चोरीचा पोलिसाचा प्लॅन फसला; बिंग फुटल्याने लोकांनी दिला चोप, VIDEO व्हायरल) पोलिसांनी या महिलेला नायर रुग्णायलामध्ये दाखल केलं होतं. त्याठिकाणी या महिलेला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की या घरातून मोठ्या प्रमाणात दागदागिने गायब झाले आहेत. त्याचप्रमाणे हत्येची घटना घडल्यानंतर नोकर देखील फरार आहे. पोलिसांनी विविध पुरावे गोळा करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शिवाय पोलिसांनी याप्रकरणी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Crime, Crime news, Mumbai, Worli

    पुढील बातम्या