• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • रात्री आजोबांनी केलं घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली तर त्यानेही केलं शोषण, मग भावानेही..

रात्री आजोबांनी केलं घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली तर त्यानेही केलं शोषण, मग भावानेही..

एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर त्या रात्री आधी आजोबा, मग काका आणि शेवटी भावाने लैंगिक शोषण केले.

 • Share this:
  चेन्नई, 15 ऑगस्ट : rape minor : मुलांना आपल्या आजोबांकडे सुरक्षित वाटतं. मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चिमुरडीसोबत घृणास्पद कृत्य समोर आलं आहे. ज्यामध्ये घरात आजोबा, काका आणि तिच्याच भावाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना तामिळनाडूतील आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर तिच्या सात वर्षांच्या नातवाच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. इतकच नाही तर मुलीसह वेगवेगळ्या वेळेत मारहाण केल्या प्रकरणात त्यांचा मुलगा म्हणजेच मुलाचा काका आणि मुलीचा 16 वर्षीय भावालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना चेन्नाईजवळी मडिप्पकममध्ये घडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलगी कामात व्यस्त होती आणि त्यात मुलांचं ऑनलाइन क्लास असल्या कारणाने आजोबा आपल्या नातवांना घरी घेऊन आले. त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगाही राहत होता. पोलिसांनी सांगितले की 2 ऑगस्टच्या रात्री तिच्याच शेजारी झोपलेले तिचे आजोबा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. घाबरलेली मुलगी तिच्या काकाच्या खोलीत गेली आणि तिला शांत करण्याच्या नावाखाली काकांनी तिच्याशी गैरवर्तन केले. यानंतर मुलगी पुन्हा तिच्या 16 वर्षांच्या भावाकडे मदतीसाठी वळली. पण तिची सुटका झाली नाही आणि तिच्या भावानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हे ही वाचा-Shocking! मुलाने तरुणीची काढली छेड तर आई-वडिलांनी जिवंत जाळलं रविवार 8 ऑगस्ट रोजी, जेव्हा मुलीची आई तिला भेटायला गेली, तेव्हा तिने पाहिले की मुलगी आजारी पडली आहे. ती मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. 7 वर्षांच्या मुलीने हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मेडिकल चेकअप केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. मुलीच्या आईने मडिप्पकम ऑलवुमन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. आजोबा, काका यांना तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. तर 16 वर्षीय मुलाला सुधारगृहात पाठविण्यात आलं आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: