मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Mumbai Crime News: पत्नी आणि मुलाने बँक अधिकाऱ्याची हत्या करुन 7व्या मजल्यावरुन ढकलले, मुंबईतील खळबळजनक घटना

Mumbai Crime News: पत्नी आणि मुलाने बँक अधिकाऱ्याची हत्या करुन 7व्या मजल्यावरुन ढकलले, मुंबईतील खळबळजनक घटना

Mumbai Crime News: मुंबईत पत्नी आणि मुलाने मिळून एका बँक अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर दोघांनी मिळून त्याचा मृतदेह इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याचंही उघड झालं आहे.

Mumbai Crime News: मुंबईत पत्नी आणि मुलाने मिळून एका बँक अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर दोघांनी मिळून त्याचा मृतदेह इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याचंही उघड झालं आहे.

Mumbai Crime News: मुंबईत पत्नी आणि मुलाने मिळून एका बँक अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर दोघांनी मिळून त्याचा मृतदेह इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याचंही उघड झालं आहे.

मुंबई, 12 फेब्रुवारी: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai)तून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरीय अंधेरी परिसरात एका 54 वर्षीय बँक अधिकाऱ्याची (Bank officer) त्याची पत्नी आणि मुलाने कथितपणे हत्या केली आहे. इतकेच नाही तर हत्या केल्यावर या दोघांनी मिळून बँक अधिकाऱ्याला इमारतीच्या 7व्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याचं बोललं जात आहे. (Mumbai Bank officer killed by wife and son, later they thrown his body from building 7th floor)

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील सिडबी क्वार्टरमध्ये सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतक व्यक्तीचं नाव संतनकुमार शेषाद्री (54 वर्षे) असं असल्याची माहिती समोर आली आहे. संतनकुमार शेषाद्री यांचा मृतदेह पाहून इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सुरुवातीला ही एक आत्महत्या असल्याचं दिसून येत होतं आणि त्यानुसार पोलीस तपास करत होते. मात्र, त्यांच्या घरातील लादीवर आणि भिंतीवर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्या अँगलने आपला तपास सुरू केला.

वाचा : डॉ सुवर्णा वाजे यांचे Mobile चॅट डिलीट, पतीने का केलं असं? तपासात नवी माहिती उघड

हत्या केल्याचं उघड

पोलिसांनी संतनकुमार यांची पत्नी जयशीला शेषाद्री आणि मुलगा अरविंद शेषाद्री यांची चौकशी सुरू केली. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. आपण दोघांनी मिळून संतनकुमार शेषाद्री यांची हत्या केली असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

हत्या करण्यामागचं कारण काय?

या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. संबंधित बँक अधिकाऱ्याच्या वागण्याला ते कंटाळले होते. हा बँक अधिकारी त्यांना खर्चासाठी पैसे देत नव्हता आणि लहान-लहान गोष्टींवरुन वाद घालत असे असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

कल्याणमध्ये दिराने अमानुषतेची केली हद्द पार; वहिनीला दिला भयंकर मृत्यू

मुंबईनजीक असणाऱ्या उंभरणी गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका तरुणाने आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं गळा आवळून वहिनीची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं खुनाची कबुली दिली आहे. आरोपीला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime, Crime news, Mother, Mumbai, Murder, Son