मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /चोरी करण्यासाठी इमारतीत घुसला आणि उडी मारून जीव गमावला

चोरी करण्यासाठी इमारतीत घुसला आणि उडी मारून जीव गमावला

या व्यक्तीला खाली उतरविण्याचे रहिवाशांनाही खूप प्रयत्न केले. त्याला जेवण देण्याची तयारीही अनेकांनी दाखवली होती.

या व्यक्तीला खाली उतरविण्याचे रहिवाशांनाही खूप प्रयत्न केले. त्याला जेवण देण्याची तयारीही अनेकांनी दाखवली होती.

या व्यक्तीला खाली उतरविण्याचे रहिवाशांनाही खूप प्रयत्न केले. त्याला जेवण देण्याची तयारीही अनेकांनी दाखवली होती.

    मुंबई, 9 जुलै : चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका व्यक्तीनं पोलिसांनी पकडू नये म्हणून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. जखमी झालेल्या या संशयित चोराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; पण तिथेच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह (Marine Drive) परिसरात शुक्रवारी (8 जुलै) ही नाट्यमय घटना घडली. या व्यक्तीचं नाव रोहित होते. रोहितने उडी मारण्याआधी त्याला खाली उतरविण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास तिथले पोलीस, वॉचमन आणि इमारतीच्या रहिवाशांनीही खूप प्रयत्न केले; पण रोहितने कुणाचंही न ऐकता चौथ्या मजल्यावरून उडी मारली आणि जीव गमावला. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    मरीन ड्राइव्हजवळच्या परिसरात शुक्रवारी (8 जुलै) पहाटे घटना घडली. एक व्यक्ती इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या पॅरापेटवर अगदी अरुंद जागेत बसलेली असल्याचं पहाटे पाचच्या सुमारास वॉचमननं पाहिलं. (an alleged Thief was Found perched on a Parapet Of A Building). इमारतीत चोर घुसल्याचं सांगून त्याने रहिवाशांना अलर्ट केलं. या व्यक्तीचं नाव रोहित असल्याचं नंतर तपासात स्पष्ट झालं. या ‘चोराला’ पाहण्यासाठी सोसायटीतल्या रहिवाशांनी थोड्याच वेळात तिथे गर्दी केली. ही व्यक्ती पॅरापेटच्या कोपऱ्यावर 3 फूट इतक्या छोट्या जागेत अक्षरश: गोठल्यासारखी बसली होती. वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या ‘D’ रोडला लागून असलेल्या भिंतीवरून ड्रेनेज पाइपलाइनवरून चढून रोहित या इमारतीत घुसला होता.

    या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरविण्यासाठी पोलीस (Police) आणि अग्निशमन दलालाही (Fire Brigade) बोलावण्यात आलं. त्याच्या जिवाला धोका आहे असं त्याला पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान वारंवार सांगत होते. पण त्यानं कुणाचंही ऐकलं नाही. त्यानं उडी मारल्यास त्याला झेलण्यासाठी खाली लावण्यात आलेल्या सुरक्षा नेट (जाळ्या) चुकवून त्यानं कंपाउंड वॉलवर उडी मारली. यामध्ये तो जखमी झाला.

    'आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा एक व्यक्ती इमारतीच्या दोन मजल्यांच्या मधल्या स्लॅबवर अगदी कोपऱ्यावर उभी होती,' असं नरिमन पॉइंट फायर स्टेशनचे सीनिअर फायर ऑफिसर शंकर पोळ यांनी सांगितलं. फायर ब्रिगेडनं अगदी तातडीनं तिथे सुरक्षा मॅटही पसरवले. पावसामुळे तिथली जागा निसरडी झाली असेल तर तो खाली पडला किंवा त्याचा पाय घसरला तरी तो जखमी होणार नाही म्हणून हे मॅट पसरविण्यात आलं; पण तो खाली उतरला नाही. हे थरारनाट्य जवळपास सकाळी 7.30 वाजेपर्यंत सुरू होतं.

    या व्यक्तीला खाली उतरविण्याचे रहिवाशांनाही खूप प्रयत्न केले. त्याला जेवण देण्याची तयारीही अनेकांनी दाखवली होती. “पण त्या व्यक्तीनं काहीही ऐकलं नाही आणि नंतर त्यानं जवळपास 25 फूट उंचीवरून उडी मारली. सगळ्यांना त्याची अवस्था बघून खूप वाईट वाटलं,” अशी भावना ‘विश्व महाल’ या इमारतीत राहणाऱ्या सुभाष हराळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्याच इमारतीत हा थरार सुरू होता.

    प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीसोबत प्रियकरानेच केलं भयानक कृत्य, दहा महिन्यांनी माहिती समोर

    जखमी झालेल्या रोहितला उपचारांसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.  तो हिंदी आणि बंगाली बोलत असल्याचं त्या वेळेस तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं. रोहित या इमारतीत चोरीच्या उद्देशाने घुसला होता, असंही पोलिसांनी सांगितलं; पण तो प्रयत्न अयशस्वी झाला आणि पकडलं जाण्याच्या भीतीनं त्यानं उडी मारली. या प्रकरणी अपघाती मृत्यूचा रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. रोहितच्या विरोधात घुसखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत त्याचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

    First published:
    top videos