जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीसोबत प्रियकरानेच केलं भयानक कृत्य, दहा महिन्यांनी माहिती समोर

प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीसोबत प्रियकरानेच केलं भयानक कृत्य, दहा महिन्यांनी माहिती समोर

प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीसोबत प्रियकरानेच केलं भयानक कृत्य, दहा महिन्यांनी माहिती समोर

मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (वय 20) ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे फार्मसी कॉलेजला शिक्षण घेत होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

गडचिरोली, 9 जुलै : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात तब्बल दहा महिन्यांपूर्वी एक तरुणी गायब (Disappeared) झाली होती. यानंतर आता या तरुणीच्या (Young Girl Murder) हत्येबाबत माहिती समोर आली आहे. पोलीत तपासात तरुणीच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रियकराला हत्येसाठी मदत करणाऱ्या मित्राला ब्रह्मपुरी पोलिसांनी (Brahmapura Police) अटक केली आहे. प्रियकरानेच मित्राच्या मदतीने केली प्रेयसीची हत्या - आरोपी तुषार बुज्जेवार याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने ऑगस्ट 2021मध्ये हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाऊस येथे नेले होते. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटले आणि तिला खाली पाडले. तसेच त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. (Girlfriend Murder by Boyfriend) इतकेच नव्हे तर यानंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तसेच तिची बॅगही तिथेच झुडपात फेकली आणि यामाध्यमतून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (वय 20) ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे फार्मसी कॉलेजला शिक्षण घेत होती. यादरम्यान 10 ऑगस्ट 2021ला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ब्रह्मपुरी पोलिसांकडे केली होती. मृत युवती ही गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी होती. आरोपी प्रियकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे देसाईगंज येथील तुषार ऊर्फ तरुण राजू बुज्जेवार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी संदीप पटले याचे देसाईगंजमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. ऐश्वर्याला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. मात्र, संदीप हा विषय पुढे ढकलत होता. ऐश्वर्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी त्याने थेट तिची हत्या केली. हेही वाचा -  PUBG Murder: मुलाचे ओठ Feviquick ने चिकटवले; हात-पाय बांधून खून आणि मृतदेह टॉयलेटमध्ये घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह काढण्यात आला. तिची बॅगही झुडूपातून काढली. युवतीचे साहित्य, चप्पल आणि जिन्स पॅन्टवरून वडिलांनी तिची ओळख पटविली. पोलीस आरोपी संदीपचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात