जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / घरी आलेल्या कामगारानेच मारला डल्ला; 20 लाखांचे दागिने घेऊन पळाला, आता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

घरी आलेल्या कामगारानेच मारला डल्ला; 20 लाखांचे दागिने घेऊन पळाला, आता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Mumbai News: घरात वायरिंगचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने घरात चोरी करुन पळ काढला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मार्च : घरातील नूतनीकरण आणि वायरिंगचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने चक्क फ्लॅटमधील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला (gold ornaments stolen) मारला होता. मुंबईतील मुलुंड परिसरात (Mulund area of Mumbai) ही घटना घडली होती. या प्रकरणी घरमालक रविकिरण नाईक यांनी 3 मार्च ला नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी रविकांत रामनारायन विश्वकर्मा (वय 33 वर्षे) यास अटक केली आहे. मुलुंडच्या टाटा कॉलनीमध्ये राहणाऱ्या रवीकिरण नाईक यांच्या घरी घराचे नूतनीकरण करण्याचं काम सुरू होतं. यातच वायरिंगचही काम करण्यासाठी आरोपी रविकांत विश्वकर्मा आला. काही दिवस त्याने काम केलं पण त्याची नजर घरातील कपाटात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर होती. रवीकिरण यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग कपाटाच्यावर ठेवली होती. आरोपी रविकांत याची नजर कापटवर ठेवलेल्या बॅगवरच होती. वाचा :  “माझी हत्या करण्याचा कट, माझा घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं” सोमय्यांचा गंभीर आरोप फ्लॅटमधील काम करणाऱ्या इतर कामगारांची नजर चुकवून त्याने ती बॅग लंपास केली. आपल्यावर पोलिसांचा संशय येऊ नये यासाठी त्याने बागेतील काही दागिने हे दुसऱ्या कामगाराच्या बागेमध्ये लपविले. ज्यावेळी रवीकिरण यांना घरामध्ये बॅग आढळून आली नाही त्यावेळी त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली.

News18

पोलिसांनी घरात नूतनीकरणाचे काम करणाऱ्या बारा कामगारांची झाडाझडती घेतली. ज्यामध्ये रवीकांत विश्वकर्मा याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखविताच अखेर रविकांतने ते दागिने आपणच चोरले असल्याचं कबूल केलं. तसेच आपल्यावर चोरीचा आळ येऊ नये यासाठी दुसऱ्या कामगाराच्या बॅगमध्ये काही सोनं लपवलं असल्याचंही कबूल केलं. वाचा :  300 रुपयांसाठी हत्या; उधार दिलेले पैसे दिले नाही म्हणून एकाचा खून, आरोपी गजाआड पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, चैन असा मिळून 20 लाख 45 हजार रुपयांचा 506 ग्रॅम वजनाचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता 380 नुसार कारवाही करत अटक केली. आरोपीने यातील काही सोनं हे सोनाराकडेही दिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी सर्व म्हणजे 100 टक्के सोन हस्तगत केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , mumbai , theft
  • First Published :
जाहिरात
जाहिरात