जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! चोरीच्या प्रकरणात दोन अभिनेत्रींना मुंबई पोलिसांकडून अटक

धक्कादायक! चोरीच्या प्रकरणात दोन अभिनेत्रींना मुंबई पोलिसांकडून अटक

धक्कादायक!  चोरीच्या प्रकरणात दोन अभिनेत्रींना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका चोरीच्या प्रकरणात अभिनेत्रींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका चोरीच्या प्रकरणात अभिनेत्रींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक केली असून या दोघीही टीव्ही (TV actresses arrested) सीरियलमध्ये काम करतात. अभिनेत्रींनी केलेली चोरी सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल तीन लाख रुपयांची चोरी केल्याचा आरोप या दोघींवर करण्यात आला आहे. सध्या या आरोपी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात आहे. या दोन्ही अभिनेत्री प्रसिद्ध टीव्ही शो क्राईम पेट्रोल आणि काही अन्य क्राईम शोमध्ये भूमिका साकारतात. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सीरियलची शूटिंग बंद झाली. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. दोघींनाही आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे त्यांनी चक्क चोरीचा मार्ग निवडला आहे.

जाहिरात

आरोपी अभिनेत्रींचा एक मित्र आरे कॉलनीमध्ये पेइंग गेस्ट चालवतो. काही दिवसांपूर्वी या दोघी तिथे राहायला आल्या. या पेइंग गेस्टमध्ये आधीपासून एक तरुणी राहत होती. त्या तरुणीचे तीन लाख रुपये चोरुन या दोघी पसार झाल्या. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. या दोघींनी पेइंग गेस्टमधून तब्बल 3 लाख 28 हजार रुपयांची चोरी केली. चोरी केल्यानंतर 18 मे रोजी आरे कॉलनीतील रॉयल पाम भागातल्या एका पॉश इमारतीत या दोन्ही अभिनेत्री पेइंग गेस्ट बनून गेल्या होत्या. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. हेही वाचा-  कहर! तब्बल 50 वेळा अटक झालेली ‘ही’ महिला आहे तरी कोण? चोरीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले. ज्याच्या आधारावर दोन्ही अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात