मुंबई, 06 एप्रिल: आजी आणि नातीचं नातं हे सायसाखरेसारखं असतं असं म्हणतात. आपल्या मुलांपेक्षाही आजी नातवंडांवर जास्त प्रेम करते. वेळ आली तर ती त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहते. याचाच प्रत्यय मुंबईतल्या एका घटनेत नुकताच आला आहे. आपल्या 13 वर्षांच्या नातीवर आपल्या मुलानेच म्हणजे त्या मुलीच्या बापानेच बलात्कार केल्याची (Rape On Daughter BY Father) तक्रार या आजीनं केली होती. आता या नराधम बापाला 25 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पॉस्को कोर्टानं (Posco Court) केवळ तीन महिन्यांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून ही शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश भारती काळे (Special Judge Bharati Kale) यांनी हा निर्णय दिला. याबद्दलचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलं आहे. ही 13 वर्षांची मुलगी 10X10 च्या खोलीत तिचे वडील, आजी-आजोबा, काका आणि भावंडांबरोबर राहते. तिची आई सात वर्षांपूर्वीच घर सोडून गेली आहे. रात्री सगळे झोपलेले असताना हा नराधम बाप आपल्या सख्ख्या पोरीवरच घरातल्या एका कोपऱ्यात लैंगिक अत्याचार करत असे. एक वर्षभर हा त्रास सहन केल्यानंतर अखेर या मुलीनं आपल्या आजीला हा प्रकार सांगितला. आपले वडील आपल्याला त्रास देतात आणि कुणाला न सांगण्याची धमकीही देतात असं या मुलीनं सांगितलं. हे ऐकल्यावर अर्थातच आजीला धक्का बसला; पण तिनं आपल्या नातीसाठी उभं राहायचं ठरवलं आणि आपल्या सख्ख्या मुलाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली (Grandmother Stands For Granddaughter). कोर्टात हा खटला उभा राहिला आणि या नराधम बापाला कडक शिक्षा सुनावण्यात आली. गोरखनाथ मंदिर हल्ल्यासंदर्भात नवा खुलासा! मुर्तझाच्या घरातून Airgun जप्त ‘खरंतर बापाला शिक्षा झाल्यानंतर या मुलांचा सांभाळ या 60 वर्षांच्या आजीलाच करावा लागणार आहे. या वयातही तिला हा त्रास सहन करावा लागणार असूनही तिनं आपल्या नातीला न्याय मिळावा यासाठी दाद मागितली, हे कौतुकास्पद आहे,’ असं विशेष न्यायाधीश भारती काळे यांनी म्हटलं आहे. सध्या पीडित मुलगी निवारा गृहात आहे. या आजीच्या धैर्याचं सगळीकडे कौतुक होत आहे. आपल्या नातीवर झालेल्या अत्याचारासाठी ती ठामपणे उभी राहिली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बहुतांश गुन्हे घरातूनच लपवले जातात म्हणून ते वाढतात. महिला आणि लहान मुलींवरच्या अत्याचारांबाबत तर दाद मागितली जाण्याचं प्रमाण खूप कमी असतं; पण या आजीनं मात्र या अत्याचाराविरोधात आवाज उठवला आणि आपल्या नातीला न्याय मिळवून देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.