Home /News /national /

गोरखनाथ मंदिर हल्लाप्रकरण: मुर्तझा घराच्या छतावर करायचा बंदूक चालवण्याची Practice, Airgun जप्त

गोरखनाथ मंदिर हल्लाप्रकरण: मुर्तझा घराच्या छतावर करायचा बंदूक चालवण्याची Practice, Airgun जप्त

या पुराव्याच्या आधारावर मुर्तझा कोणताही मोठा गुन्हा करू शकला असता. मुर्तझा गेल्या काही दिवसांपासून घराच्या गच्चीवर एअरगन चालवायचा शिकत होता.

    उत्तर प्रदेश, 06 एप्रिल: गोरखपूरमधील (Gorakhpur) गोरखनाथ मंदिराचे (Gorakhnath temple) रक्षण करणाऱ्या जवानांवर चाकूने हल्ला केलेला आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी (Ahmed Murtaza Abbasi) याच्या घरातून पोलिसांना नवे पुरावे मिळाले आहेत. या पुराव्याच्या आधारावर मुर्तझा कोणताही मोठा गुन्हा करू शकला असता. मुर्तझा गेल्या काही दिवसांपासून घराच्या गच्चीवर एअरगन चालवायचा शिकत होता. जप्त करण्यात आलेली एअरगन आणि शार्पनल गोरखपूर पोलिसांनी यूपी एटीएसकडे सोपवले आहेत. मुर्तझा सध्या पोलीस कोठडीत आहे. सोमवारी रात्री 8 ते 11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान पोलीस आणि सुरक्षा तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीने चौकशी करत आहेत. मुर्तझा ISI शी संबंधित बघायचा व्हिडिओ विशेष म्हणजे मुर्तझाच्या चौकशीत आणि तपास यंत्रणांना समोर आले आहे की, तो सतत ISIS शी संबंधित व्हिडिओ पाहत असे. याशिवाय मौलाना झाकीर नाईक यांची प्रक्षोभक भाषणंही कट्टरवादी पाहत असत. चौकशीदरम्यान, इंटरनेटवर जिहादी व्हिडिओ शोधत असताना तो अतिरेक्यांच्या संपर्कात आल्याचं सुरक्षा दलाला आढळून आलं आहे. दरम्यान जिहादी व्हिडिओ शोधल्यानंतर त्यानं त्यात कमेंट केली होती. ज्याद्वारे तो कट्टरपंथी दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ पुढे आला होता. मुर्तझाला जिहादी बनवण्यासाठी कट्टरवाद्यांनी अतिशय चतुर पद्धत अवलंबली होती. याशिवाय नेपाळला जाताना मुर्तझा सीमावर्ती भागातील मदरशांमध्येही गेला होता, असे तपासात निष्पन्न झालं आहे. मुर्तझा ATS च्या ताब्यात मंगळवारी संध्याकाळी उशिरा एटीएसनं गोरखपूरमधील सिव्हिल लाइन्स येथील मुर्तझाच्या घरातून एकाला ताब्यात घेतलं. मात्र अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही. पोलिसांनी त्याच्या घराला कुलूप लावलं असून घराचा काही भाग अब्बासी कुटुंबीयांना राहण्यासाठी सोडला आहे. रात्री आठच्या सुमारास मोर्तझाचे मेडिकल करण्यात आलं. यानंतर रात्री त्याच्यासोबत टीम लखनऊला रवाना झाली. एटीएस, पोलीस, एसटीएफ आणि गुप्तचर विभागाची सुमारे डझनभर पथके मंदिरात प्रवेश करण्यासाठी, दहशतवादी कट आणि हल्लेखोर मुर्तझाचा हेतू तपासण्यासाठी गुंतल्या आहेत. नेपाळ, मुंबई, कोईम्बतूर, जामनगर, गाझीपूर आणि जौनपूर व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यांमध्ये पथकांनी सुगावा शोधण्यास सुरुवात केली आहे. 'रामनवमी- हनुमान जयंती साजरी करा', Congress अध्यक्षांच्या आदेशाला मुस्लिम आमदारानं केला विरोध रविवारी संध्याकाळी गोरखनाथ मंदिराच्या दक्षिणेकडील गेटवर पीएसी जवान गोपाल गौर, अनिल पासवान यांच्यावर हल्ला करणारा मुर्तझा सात दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. मुर्तझाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंवरून तो कोणत्या तरी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं अनेक प्रकारचे पुरावे मिळाले आहेत. बँक खात्यांचा तपास एटीएस मुर्तझाच्या बँक खात्यांचे स्कॅनिंग करत आहे, जेणेकरून त्याचे दहशतवादी संघटनेशी संबंध शोधता येतील. एक टीम गाझीपूरलाही गेली ज्याने त्याची पहिली पत्नी आणि सासऱ्यांची चौकशी केली. घटस्फोटानंतर दोन वर्षांपासून पहिली पत्नी शादमा वेगळी राहत असल्याचं कुटुंबीयांनी सांगितले. त्याचा मुर्तझाशी काहीही संबंध नाही. आरोपीच्या लॅपटॉपमध्ये दहशतवाद्याचा साठा सापडला सिव्हिल लाइन्सचे रहिवासी मुनीर अब्बासी यांचा मुलगा मुर्तझा याने केलेल्या कृत्याचा विचार करून, दहशतवादी कटाचा भाग म्हणून सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएस आणि एसटीएफकडे सोपवला आहे. यूपी एटीएससह देशभरातील सर्व गुप्तचर यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत आहेत. गुजरात एटीएसचे एक पथकही गोरखपूरला येत आहे. मुर्तझा दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. घराची झडती घेत एटीएसने त्याचा जुना लॅपटॉप जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये दहशतीचा एक 'ठिकाणा' सापडला आहे. यामध्ये गनिमी कावावर आधारित एक व्हिडिओ सापडला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh news

    पुढील बातम्या