सागर, 8 मार्च : अनैतिक संबंधातून अनेकदा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते. सागर पोलिसांनी अशाच एका खुनाचा उलगडा केला आहे. जसजसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला तशा धक्कादायक बाबी समोर आल्या. सागर येथील एका गावात आठ मुलांच्या आईने आपल्या मोठ्या मुलासोबत एका व्यक्तीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी महिला आणि तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्या तरुणाने ज्याची हत्या केली ते त्याचे वडील असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेला 50 वर्षीय बारेलाल तीन दिवस घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या बहिणीने सागरच्या बांदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. दोन दिवसांपूर्वी संशयाच्या आधारे पोलिसांनी बारेलालचा मृतदेह जंगलात खोदून जप्त केला होता. चौकशीत मयत बारेलाल अहिरवार याचे वहिनी असल्याचे भासवणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. 24 फेब्रुवारी रोजी महिलेच्या मुलाने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.
यानंतर आरोपी 20 वर्षीय तरुणाने बारेलालची निर्घृण हत्या करून मृतदेह खजरा भेडा वनविभागाच्या मळ्यातील खड्ड्यात पुरला. पोलिसांच्या चौकशीत आरोपी तरुणाने आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने चौकशीदरम्यान सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या आईसोबतच्या अवैध संबंधांचा जाब विचारला तेव्हा त्या महिलेनेच त्याला बारेलालची हत्या करण्यास प्रवृत्त केले आणि हत्येनंतर पुरावे लपवण्यात मदत केली.
वाचा - गे पार्टनरला करायचं होतं मुलीशी लग्न, पण बिझनेसमनचा अडथळा, शेवट झाला धक्कादायक!
ऐकून पोलिसांनाही धक्का बसला
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलेलाही पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. महिलेने सांगितले की, 25 वर्षांपूर्वी तिचा बालविवाह झाला होता. तिचा नवरा वयस्कर होता, तेव्हापासून ती तिचा मामेभाऊ बारेलालच्या संपर्कात आली होती. त्यानंतर महिलेने पोलिसांना जे सांगितले ते सर्वच धक्कादायक होतं. महिलेने सांगितले की, माझा मुलगा जो आता आरोपी आहे, तो माझ्या वयस्कर पतीचा नसून मयत बारेलालचा मुलगा आहे. तिने सांगितले की तिला 8 मुले आहेत, त्यापैकी सर्वात मोठा 20 वर्षांचा आरोपी तरुण आहे. सर्वात लहान फक्त 3 महिन्यांचा आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला त्याच्या आईसह हत्येला प्रोत्साहन देण्याच्या आणि पुरावे लपवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले आहे.
आरोपी मुलाला पश्चात्ताप
पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, चौकशीदरम्यान तरुणाला ही गोष्ट समजताच त्याला खूप पश्चाताप झाला. हे आधी का सांगितले नाही? अशी विचारणाही त्याने आईला केली. मात्र, मुलाचा प्रश्न ऐकून आई काहीच उत्तर देऊ शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime