बंगळुरू, 7 मार्च : बंगळुरूमध्ये झालेल्या व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यावसायिकाची त्याच्याच सहकाऱ्याने एक आठवड्यापूर्वी हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. सुरुवातीला ही हत्या आर्थिक वादामुळे झाली असल्याचा संशय पोलिसांना होता, पण तपासानंतर या दोघांमध्ये असलेले समलैंगिक संबंध हत्येला कारण ठरल्याचं समोर आलं.
बंगळुरूमध्ये ऍड एजन्सी चालवणाऱ्या 44 वर्षांचे व्यापारी लियाकत अली खान यांची 26 वर्षांच्या इलियास खानने डोक्यात हातोडा मारून आणि कात्रीने वार करून हत्या केली. मैसुरू रोडवर असलेल्या नयनदहल्लीमधल्या एका जुन्या इमारतीत इलियासने लियाकतला संपवलं. लियाकतचा मुलगा वडिलांचा शोध घेत असताना त्याला 28 फेब्रुवारीला 2 वाजता मृतदेह आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इलियासला महिलेसोबत लग्न करायचं होतं, पण त्याला लियाकतसोबतच्या संबंधाची कुटुंबाला माहिती मिळेल अशी भीती वाटत होती. लियाकत आणि इलियास यांच्यात लॉकडाऊनदरम्यान समलैंगिक संबंधांना सुरूवात झाली. दोन वर्ष या दोघांमध्ये संबंध होते. इलियासने लियाकतला लग्न करत असल्यामुळे संबंध तोडायला सांगितले, पण लियाकतने याला नकार दिला आणि इलियासला संबंध कायम ठेवण्यासाठी मजबूर केलं. याच कारणामुळे इलियासने लियाकतची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
घटनेच्या दिवशीही लियाकत आणि इलियास यांच्यात शारिरिक संबंध झाले, तेव्हा इलियासने लियाकतला त्याच्या भविष्याबाबत सांगितलं, यानंतर दोघांमध्ये वाद आणि बाचाबाची झाली. रागाच्या भरात इलियासने लियाकतला हातोड्याने मारलं आणि मग कात्रीने वार केले.
लियाकतचं आधीच लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत. लियाकतच्या मुलाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना सुरूवातीला या प्रकरणात तीन जणांचा सहभाग असल्याचा संशय होता, पण तपासात हा एँगल आल्यामुळे पोलीसही चक्रावले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.