मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मोटरमनच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला; पुणे स्टेशनवरील घटनेचा CCTV Video

मोटरमनच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला; पुणे स्टेशनवरील घटनेचा CCTV Video

शनिवारी रात्री लोणावळावरून पुणे स्टेशनकडे लोकल चालवत असताना त्यांना पुणे स्टेशनजवळ एका चिमुकलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सतर्क असलेल्या मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवली (Pune Kidnapping Video)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 13 सप्टेंबर : एका दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार एका लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील लोको शेडजवळ घडली. खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी भागात राहणारे मोहम्मद रफीक अमीर सुलेमानी (वय ५५ वर्षे) असं या जिगरबाज मोटरमनचं नाव आहे.

अचानक जवळ येत तिघांनी तिला गाडीत ओढलं, पण..; चिमुकलीने असा हाणून पाडला अपहरणाचा डाव

शनिवारी रात्री लोणावळावरून पुणे स्टेशनकडे लोकल चालवत असताना त्यांना पुणे स्टेशनजवळ एका चिमुकलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सतर्क असलेल्या मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवली. तेव्हा एकजण अंधारामध्ये या चिमुकल्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून पळून जात असल्याचं दिसलं. यावेळी मोहम्मद रफीक सुलेमानी यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी त्या मुलीला तिथेच सोडून पळून गेला. यावेळी प्रवाशांच्या मदतीने मुलीची सुटका केली गेली. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला होता.

दरम्यान त्या मुलीची चौकशी केली असता ती आईसोबत महालक्ष्मी एक्स्प्रेसने किर्लोस्करवाडी येथे निघाली असल्याचं समजलं. सर्वांनी तात्काळ प्लॅटफॉर्म नंबर एकवर धाव घेतली. त्यानंतर आईचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं गेलं. आईला पाहताच या मुलीने हंबरडा फोडला. स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले असता संबंधित आरोपी त्या मुलीला जबरदस्तीने घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तक्रार नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असूनही तक्रार नसल्याचे कारण देत रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. त्यामुळे आरोपी अद्यापही मोकाटच आहे.

First published:

Tags: Kidnapping, Pune crime