मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आईने स्वत:च्या तीन मुलींची केली हत्या, सकाळी पोहोचली पोलीस ठाण्यात; हादरवणारं कारण

आईने स्वत:च्या तीन मुलींची केली हत्या, सकाळी पोहोचली पोलीस ठाण्यात; हादरवणारं कारण

पोलिसांनी महिलेला या कृत्यामागील कारण विचारलं, यानंतर महिलेने जे काही सांगितलं ते ऐकून पोलीस हैराण झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 3 सप्टेंबर : बिहारमधील बक्सर जिल्ह्यातून एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्या तीन मुलींची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यानंतर महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. जेव्हा महिलेने मुलींच्या हत्येचं कारण सांगितलं, तेव्हा पोलीसही हैराण झाले. महिलेने आपला गुन्हा कबुल केला आहे.

महिला पोलीस ठाण्यात गेली, आणि पोलिसांना सांगितलं की, मी माझ्या तीन मुलींची हत्या केली आहे. पोलिसांनी तीनही मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि पोस्टमार्टमसाठी रवाना करण्यात आले आहे. महिलेने पुढे सांगितलं की, गुरुवारी रात्री मी माझ्या तीनही मुलींची हत्या केली. गावात ही गोष्ट कळताच खळबळ उडाली.

महिला कपडे बदलायच्या 'तो' खिडकीच्या फटीतून VIDEO करायचा, मुंबईतून तीन जण अटकेत

हैराण करणारं कारण...

महिलेने मुलींना का मारलं, याबाबत गावात कुणाला काहीही माहित नव्हतं. शेवटी महिलेने सांगितलं की, मला तीन मुली होत्या. एक 11 वर्षांची, दुसरी 8 तर तिसरी 3 वर्षांची होती. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकाला मुलगा झाला. मुलगा झाल्याचं वृत्त ऐकताच ती डिप्रेशनमध्ये गेली. यानंतर त्याच रागात तिने एक एक करीत आपल्या तीनही मुलींची हत्या केली. सकाळी जेव्हा महिलेच्या सासूने तिला चहासाठी आवाज दिला तर महिला घरात नव्हती. त्यांनी खोलीत पाहिलं तर तेथे तीनही मुलींचे मृतदेह होते. तिघींना उशीने तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Murder