लखनऊ, 1 सप्टेंबर : आईनेच (Mother) गळा दाबून आपल्या मुलीची (Daughter) हत्या (Murder) केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. आपल्या मुलीचे असणारे प्रेमसंबंध (Love Affair) मान्य नसल्याने आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर प्रियकराने (Boyfriend) तिला मारलं असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आलं. अशी घडली घटना उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील वैदपुरा गावात प्रियंका नावाच्या मुलीचं त्याच गावातील राजकुमार नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रियंकाच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रियंका आपल्या निर्णयावर ठाम होती. कुंकू लावल्याचा आला राग एक दिवस प्रियंका आणि तिची आई निर्मला देवी या बाजारात गेल्या होत्या. बाजारातून घरी आल्यानंतर प्रियंकानं कुंकू घेतलं आणि ते लावलं. आपण आपल्या प्रियकराच्या आणि होणाऱ्या पतीच्या नावे हे कुंकू लावत असल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या निर्मला देवीने पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला. रचना बनाव मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह फासावर लटकवून आईनेच बनाव रचला. प्रियंकाला त्रास देणारा गावातील राजकुमार नावाचा तरुण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रियंकाचा खून केल्याचा आरोप तिने केला. प्रियंकाच्या वडिलांनी तशी रितसर तक्रारही नोंदवली. पोलिसांनी तीन पथकं तयार करून या घटनेचा तपास सुरू केला. मात्र तपासादरम्यान प्रियंकाच्या डोक्यावरील कुंकू पाहून पोलिसांना संशय आला. त्यातूनच आईनेच तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं. हे वाचा - 23 वर्षांनी पाकिस्तानातून परतले प्रल्हाद, इतक्या यातना सोसल्या की बोलताही येईना स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीच्या प्रियकराचं नाव जाणीवपूर्वक पुढं केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निर्मला देवीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.