अनूप पासवान (कोरबा) 15 मार्च : छत्तीसगडमधील कोरबाच्या जंगलात मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान मागच्या 24 तासात पासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलियामार गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय दुवासियाने तिची 11 वर्षांची मुलगी सुनीता हिच्यासह जवळच्या गावातील शेतात माती गोळा करण्यासाठी गेली होती.
माती खोदत असताना दोघांवर रानडुकरांनी हल्ला केला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी दुवासियाने आपल्या जिवाची पर्वा न करता रानडुकराशी लढा दिला. सुमारे अर्धा तास चाललेल्या दोघांमधील संघर्षात दुवासियाचा मृत्यू झाला. याचवेळी रानडुकराचाही जागीच मृत्यू झाला.
19 गोळ्यांनी शरीराची चाळण.. उमेश पाल प्रमाणेच 18 वर्षांपूर्वीचं राजू पाल हत्याकांडमहिलेचा व रानडुकराचा मृत्यू झाल्याची वार्ता जंगलातील लोकांना समजताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. वनविभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले यावेली तातडीने पावले उचलत. महिलेच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. रानडुक्करही जागीच मृतावस्थेत आढळून आले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला त्यावरून दोघांमध्ये किती जोरदार संघर्ष झाला असेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही.
मृत महिलेची मुलगी सुनीता हिने सांगितले की, तिची आई माती खोदत होती. जवळच डुकरांचा कळप आला. डुकरांचा कळप तिच्या दिशेने येत होती, ते पाहून मुलगी सुनीता धावू लागली. दरम्यान मुलीला वाचवण्यासाठी आईने रानडुकरांशी झुंज दिली. त्यानंतर तिने धावत घरी जाऊन वडिलांना माहिती दिली. मात्र सर्वजण येण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला.
रेल्वेनं तुकडे केले तरी सोडली नाही साथ, प्रेमीयुगुलांचे मृतदेह पाहून गावकरी हळहळलेपासन रेंजर रामनिवास दहायत यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच ते टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. जिथे डुक्कर आणि महिला दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसले. मृतांच्या नातेवाईकांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून महिलेचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला आहे, तर रानडुकराचे पीएम पशुवैद्यकामार्फत केले जाणार आहे.