मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पदवी नसलेल्या महिला डॉक्टरने केली प्रसुती, महिलेसह नवजात बाळाचा मृत्यू

पदवी नसलेल्या महिला डॉक्टरने केली प्रसुती, महिलेसह नवजात बाळाचा मृत्यू

महिलेची प्रसुती करताना अतिरक्तस्राव झाल्याने मातेसह तिचा नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. (Mother and Newborn Baby Died) आपत्कालीन स्थितीत कोणत्याही सुविधा आणि तज्ज्ञ नसतानादेखील या महिलेची प्रसुती करण्यात आली. त्यात मातेसह नवजात बालकाचा मृत्यू झाला.

पुढे वाचा ...

बीड, 17 मे : महिलेची प्रसुती करताना अतिरक्तस्राव झाल्याने मातेसह तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. (Mother and Newborn Baby Died) आपत्कालीन स्थितीत कोणत्याही सुविधा आणि तज्ज्ञ नसतानादेखील या महिलेची प्रसुती करण्यात आली. त्यात मातेसह नवजात बालकाचा मृत्यू झाला. सोनाली पवन गायकवाड असे 22 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. सोनाली बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खेर्डा येथील रहिवासी होती. ही घटना माजलगाव शहरातील जाजू रुग्णालयात (Jaju Hospital) घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

22 वर्षीय सोनाली या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी सांडस चिंचोली येथे आली होती. तिला रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास माजलगाव येथील जाजू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मध्यरात्री तिला त्रास जाणवू लागला. रुग्णालयातील डॉ. उर्मिला जाजू यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

त्यानंतर डॉ. उर्मिला यांनी सोनालीवर तात्पुरते उपचार केले. मात्र, तरीही तिचा त्रास थांबला नाही. यानंतर आम्हाला रुग्णाला घेऊन जायचे आहे, असे सोनालीच्या नातेवाईकांनी सांगितले. तर असे म्हणताच आम्ही तुमच्या मुलीची नॉर्मल प्रसुती करू, असे आश्वासन डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना दिले.

यानंतर सकाळी सात वाजेच्या सुमारास सोनालीची प्रसुती झाली. तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने अवघ्या तासाभरातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्काच बसला. त्याने आक्रमक भूमिका घेत रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कुटुंबीयांचे काय म्हणणे -

माझ्या बहिणीच्या प्रसुतीनंतर अवघ्या तासाभरात तिचा मृत्यू झाला. तब्बल 12 तास त्रास झाला तसेच प्रकृती गंभीर होती, तरीही डॉक्टरांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामळे या डॉक्टरांवर कारवाई व्हावी, असे मृताचा भाऊ गोविंद काळे याने म्हटले आहे. तर माजलगावात जी घटना घडली त्यासंदर्भात एक चौकशी समिती नेमली जाईल आणि लवकरात लवकर अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले आहेत.

हेही वाचा - 'तू पांढऱ्या पायाची म्हणत' पती आणि सासूने नवविवाहितेला पेटवलं, बीडमधील खळबळजनक घटना

डॉक्टर उर्मिलाकडे कोणतीही पदवी नाही -

दरम्यान, डॉ. उर्मिला जाजू यांनी याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर डॉ. उर्मिला जाजू यांच्याकडे प्रसुती करण्याची कोणतीही पदवी नाही. त्यामुळे या प्रकरणात 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सहायक अधीक्षक पंकजा कुमावत यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Baby died, Crime, Death, Small baby, Woman doctor