जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आई-मुलीचे एकाच मुलाशी संबंध? आधी प्रेम, मग घरी बोलावले आणि मृत्यू... नक्की असं काय घडलं?

आई-मुलीचे एकाच मुलाशी संबंध? आधी प्रेम, मग घरी बोलावले आणि मृत्यू... नक्की असं काय घडलं?

अयान

अयान

खरंतर दक्षिण कोलकाता येथील हरिदेवपूर येथून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुण अयानचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 9 ऑक्टोबर : आपल्यासमोर अनेकदा अशा काही गोष्टी येतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील फार कठीण होऊन बसते. हल्लीच दक्षिण कोलकाता यथून एक बातमी समोर आली आहे, ज्याने सगळ्यांनाच हादरवलं आहे. खरंतर प्रेमात आणि लढाईत सगळं माफ असतं असं म्हणतात. परंतू या त्रिकोनी प्रेमात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की, कायद्याच्या नजरेत काहीही माफ नाही. खरंतर दक्षिण कोलकाता येथील हरिदेवपूर येथून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुण अयानचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. दोघे 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते पोलीस सूत्रांनी सांगितले की, अयानची गेल्या 7 वर्षांपासून एका मुलीशी ओळख होती. यासोबतच त्यांच्या भेटीची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. अनेकदा दोघेही एकमेकांच्या घरी जात असत. अयानच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दशमीच्या रात्रीही अयानला त्या मुलीचा फोन आला, ज्यामुळे तो त्याच्या घरी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. अयानच्या वडिलांचा असा दावा आहे की अयानचे त्याच्या मैत्रिणीच्या आईसोबतही संबंध होते. अयान जस जसा या मुलीच्या घरी येत राहिला त्याची ओळख या मुलीच्या आईशी देखील झाली. ज्यानंतर आई-मुलगी दोघेही प्रेमावरुन भांडायचे असं देखील म्हटलं जात आहे, ज्यामुळे अयानचा मृतू झाल्याचा दावा आहे. परंतू पोलीस सध्या या दाव्याची चौकशी करत आहेत. मित्राला शेवटचा कॉल अयानच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी दुपारी ३.०३ वाजता त्याने त्याच्या मित्रांना फोन केला होता. त्याने फोन करून सांगितले की त्याच्या मैत्रिणीच्या आईने त्याला पकडले आहे. तेथे त्याने खूप मार देखील खाल्ला आहे. त्याच्या छातीवर देखील लाथ मारली. तेव्हा अयानच्या मित्राने त्याला तुला मदत हवी आहे का असे विचारले, परंतू तेव्हा अयान उत्तर देले की त्याची काही गरज नाही, तो एकटाच घरी परत येऊ शकतो. परंतू त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही, ज्यानंतर अयानचा मृतदेहच मिळाला. दक्षिण कोलकाता येथील रहिवासी असलेल्या अयानच्या हत्येबाबत काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. अयानच्या मित्राचे जबाब, प्राथमिक तपास आणि आरोपीच्या चौकशीच्या आधारे हरिदेवपूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृताची गर्लफ्रेंड, तिची आई आणि तिचा 11 वर्षांचा भाऊ यांचा समावेश आहे. हे ही वाचा : हा Video थरकाप उडावणारा! कोणत्याही सेफटी शिवाय 23व्या मजल्याच्या छतावरुन Stunt करु लागला व्यक्ती पोलिसांची संशय काही वेगळा पोलिसांच्या तपासात अयानच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. आधी प्रेयसीने घरी कोणी नसल्याचे सांगून फोन केला. अयान तिथे पोहोचला तेव्हा त्याला दिसले की सर्वजण त्याच्या प्रेयसीच्या घरी आहेत. मैत्रिणीची आई तिच्या भावाने आधी अयानला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर जड वस्तूने प्रहार केला. असे पोलिसांचे म्हणणे आहे. नंतर अयान मेला असे वाटल्यावर त्याला मग झुडपात फेकून दिले. त्याचवेळी अयानच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, केवळ हे तीनच नाही तर इतरही अनेक लोक यात सामील आहेत. पुढील कारवाईनंतर पोलीस आणखी लोकांना अटक करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात