जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्याहून सुरू झालेला तो प्रवास ठरला शेवटचा.. आई-मुलाचा बसमध्ये जीव गुदमरल्याने मृत्यू, ड्रायव्हरवर गंभीर आरोप

पुण्याहून सुरू झालेला तो प्रवास ठरला शेवटचा.. आई-मुलाचा बसमध्ये जीव गुदमरल्याने मृत्यू, ड्रायव्हरवर गंभीर आरोप

(फोटो - मीडियावाला)

(फोटो - मीडियावाला)

पुण्याहून उज्जैनला येणाऱ्या बसमध्ये आई आणि मुलाचा संशयास्पद परिस्थितीत गुदमरून (suffocation) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनीही बसमध्ये गुदमरल्याची तक्रार केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 20 एप्रिल: पुण्याहून उज्जैनला येणाऱ्या बसमध्ये आई आणि मुलाचा संशयास्पद परिस्थितीत गुदमरून (suffocation death) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  दोघांनीही बसमध्ये गुदमरल्याची तक्रार केली होती. मात्र, बसच्या वाहकाने लक्ष दिले नाही. बसमध्ये लावलेल्या अग्निशामक यंत्रातून गॅस गळती झाल्याने ही घटना घडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही बस अशोका ट्रॅव्हल्सची होती. संयोगितागंज पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काय आहे नेमकी घटना? उज्जैन येथे दीपिका संदीप पटेल (38 वर्षे) या शिक्षिका होत्या.  त्या रविवारी रात्री मुलगा आदित्य राज (11 वर्षे) आणि आई पुष्पा (56 वर्षे) यांच्यासह अशोक ट्रॅव्हल्सच्या एसी बसने (MP07- P-5097) पुण्याहून उज्जैनला निघाल्या. दोघांनीही बसमध्ये गुदमरायला होत असल्याचे तक्रार केली होती. मात्र, गॅसचा वास येत असल्याचे सांगून कंडक्टरने लक्ष दिले नाही. पण, ते इंदूरला पोहोचेपर्यंत दीपिका आणि तिचा मुलगा आदित्य यांची प्रकृती ढासळू लागली. हे वाचा- ठाण्यात सख्ख्या भावाकडून 50 हजाराची हत्येची सुपारी, तरुणाचा निर्घृण खून त्यांची तब्येत बिघडल्यावर बस वाहकाने दोघांनाही इंदूरच्या मध्यभागी खाली सोडले आणि ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये पाठवले, जिथे दोघांचा मृत्यू झाला. यानंतर एमवाय हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिस बस चालक आणि वाहकाचेही जबाब घेणार आहेत. तसेच शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच नेमकी कारणे समोर येतील. हे वाचा- मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां वादात, आई-वडिलांनी केले गंभीर आरोप ट्रॅव्हल्सच्या संचालकाचे काय म्हणणे? ट्रॅव्हल्स संचालक राजेश शर्मा यांनी सांगितले की, महिलेने तब्येत बिघडल्याची तक्रार केली होती. बसमध्ये इतर 30 प्रवासीही प्रवास करत होते. यापैकी कोणाचीही प्रकृती बिघडलेली नाही. महिलेनंतर तिच्या मुलालाही उलट्या आणि जुलाब होऊ लागले. दोघांनाही वाहनात उलट्या झाल्या, त्यामुळे त्यांना केबिनमध्ये हलवण्यात आले. वाटेत एका ठिकाणी गाडीही थांबली. इंदूरला येईपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच बिघडली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात