जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / रात्री 12 ते 1 दरम्यान टारगेट सेट करायचा आणि रात्री....; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 35 हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला अटक

रात्री 12 ते 1 दरम्यान टारगेट सेट करायचा आणि रात्री....; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 35 हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई क्राईम स्टोरी

मुंबई क्राईम स्टोरी

मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 फेब्रवारी : गेल्या काही दिवसात राज्यात आर्थिक फसवणूक तसेच गुन्हेगारीच्याही घटना घडत आहेत. त्यातच मुंबईत काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या तब्बल आठ घडना घडल्या होत्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांना मोठे यश आले आहे. सापळा रचत पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला पकडले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पाच सेकंदात फ्लॅटचे कुलूप तोडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रईस शेख असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात 35हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री ते पहाटे 1 च्या दरम्यान परिसराचा शोध घेणे आणि टारगेट सेट केल्यानंतर सकाळी 3 ते पहाटे 4 च्या दरम्यान ते तोडणे अशी त्याच्या कामाची पद्धत होती. पोलिसांनी सांगितले की, चोरी करण्यापूर्वी तो त्याचा गेट-अप बदलायचा आणि आणि एक जॅकेट घालायचा. अभ्युदय नगरमध्ये 8 फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या सोसायटीतील आठ फ्लॅटचे कुलूप तुटलेले आढळले. एकूण, घरांमधून सुमारे 10,000 रुपये रोख चोरीला गेल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले तेव्हा जॅकेट घातलेला एक माणूस रुमालाने चेहरा झाकलेला त्यांना दिसले. दरम्यान, काळाचौकी पोलिसांनी पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता, 2018 मध्ये शेखला अटक करण्यात आली होती आणि त्याची घरफोडीची शैली गुन्हेगारासारखीच होती. त्यामुळे तपासादरम्यान, पोलिसांना कळले की आरोपीने रात्री 12 ते 1 या दरम्यान परिसरात फिरून कुलूप लावलेली घरे तपासली होती. यानंतर पहाटे 3 च्या सुमारास घर फोडण्यास सुरुवात केली आणि एक तासानंतर त्याचे काम पूर्ण केले. हेही वाचा -  भयानक, 20 रुपयांची नोट दाखवून जवळ बोलावलं, अंध आईसोबत भीक मागणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, बीड हादरलं काळाचौकी पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र चव्हाण यांनी ‘मिड-डे’ला सांगितले की, “8 फेब्रुवारी रोजी अभ्युदय नगरमध्ये घरफोडीच्या आठ घटना घडल्यानंतर घबराट पसरली होती. आम्ही प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. शेखने 2018 मध्ये याच भागात असेच गुन्हे केले होते. यापूर्वी तो अँटॉप हिल येथे राहत होता. पण आम्हाला आढळले की, 8 फेब्रुवारी नंतर तो मालवणी येथे आपल्या पत्नीसह राहत आहे.” त्यामुळे “आम्ही त्याला सोमवारी त्याच्या राहत्या घरी पकडले. त्याच्या पत्नीला त्याच्या गुन्ह्यांबद्दल माहिती होती, हेदेखील आम्हाला समजले. त्याच्याकडून तो घरफोडीसाठी वापरत असलेला एक पोपट पाना (स्पॅनर) आणि स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आले आहे. आरोपीवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. 7 फेब्रुवारीला त्याची तुरुंगातून सुटका झाल्याचेही आम्हाला आढळल्याचे पोलिसांनी म्हटले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात