मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मिठी मारत चुंबन घेण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेत्यावर महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषणाचा आरोप

मिठी मारत चुंबन घेण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेत्यावर महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषणाचा आरोप

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मनोज करजागी, असे या काँग्रेस नेत्याचे नाव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karnataka, India
  • Published by:  News18 Desk

धारवाड, 18 सप्टेंबर : देशात बलात्कार, अत्याचार तसेच लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता एका राजकीय पक्षाच्या नेत्याने एका महिलेसोबत धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. कर्नाटक काँग्रेसमधील एका नेत्याने सलूनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण केले, अशी माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मनोज करजागी, असे या कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचे नाव आहे. ब्युटीशियनचं काम करणाऱ्या या महिलेने त्याच्या विरोधात तक्रार केली. तिने आपल्या तक्रारीमध्ये आरोप केला की, आरोपी मनोज करजागी शनिवारी सलूनमध्ये आला होता. यावेळी त्याने या महिलेला जबरदस्तीने मिठी मारण्याचा आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने तिच्या प्रियकराला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तिच्या प्रियकराने दोन मित्रांसोबत सलूनमध्ये धाव घेतली आणि या काँग्रेस नेत्याची धुलाई केली.

आरोपी काँग्रेस नेता मनोज करजागी

आरोपी काँग्रेस नेता मनोज करजागी

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी या काँग्रेस नेत्याला अटक केली आहे. आरोपीला महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी मनोज करजागी हा काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याचा सहकारी आहे. तसेच तो पक्षकार्यामध्ये सक्रिय आहे.

हेही वाचा - हॉस्टेलमधील तरुणींचे अंघोळ करतानाचे Video लिक! तरुणाच्या सांगण्यावरुन तरुणी.. इनसाइड स्टोरी

काँग्रेस नेते सिद्धारामय्या मुख्यमंत्री असताना तो उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य पहिवहन निगमचा संचालक होता. माजी मुख्यमंत्र्यांसोबत त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. महिलेचे लैंगिक शोषण करण्यासह इतर आरोपांखालीही आरोपीला अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Karnataka, Political leaders