एका मोबाइल चोरीचे 500 रुपये; लहान मुलांची गँग पोलिसांच्या ताब्यात

एका मोबाइल चोरीचे 500 रुपये; लहान मुलांची गँग पोलिसांच्या ताब्यात

मोबाइल चोर कुठल्या युक्त्या वापरून मोबाइलवर डल्ला मारतील सांगता येत नाही. एक असाच प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

  • Share this:

गाझियाबाद, 20 फेब्रुवारी : मोबाइल चोरांचा (mobile thieves) शहरांमध्ये अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. मात्र आता मोबाइल चोरांबाबत अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबाद (Ghaziabad) इथली ही घटना आहे.

गाझियाबादच्या इंदिरापुरम ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी मोबाईल चोरी गँगला (gang) ताब्यात घेतलं. ही गॅंग लहान मुलांच्या  (small kids) माध्यमातून मोबाईल चोरी करायची. एका लहान वयाच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून नऊ मोबाईल, चार चाकू (knife) आणि एक ऑटो (auto) पोलिसांनी जप्त केला आहे. या लहान मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना अभयखंड इथल्या शनी मंदिराजवळून रात्री ताब्यात घेतलं. यातला ऑटो चालक देवेन्द्र कुमार मूळचा बिहारमधील सहरसा इथला राहणारा आहे. हा देवेन्द्र आपला भाऊ प्रवीण कुमारसोबत मिळून दिल्ली-एनसीआरच्या (Delhi NCR) गर्दीच्या ठिकाणांवर (crowded places) लहान मुलांकडून मोबाईल चोरी करवत असे. एक मोबाईल चोरी केल्यावर तो मुलाला पाचशे रुपये द्यायचा.

हे ही वाचा-लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीचा जीवचं घेतला; परिसरात खळबळ

पोलिसांच्या चौकशीत आरोपी देवेन्द्र म्हणाला, तो लक्ष्मीनगर इथून लहान मुलांना ऑटोमधून एनसीआरला नेत असे. गर्दीचा फायदा घेत मुलं मोबाईल चोरायची. लहान मुलगा मोबाईल चोरल्यावर लगेच यांच्यापैकी कुणाला द्यायचा. कधी ही लहान मुलं पकडली गेल्यावर आरोपीच मध्यस्थी करत त्यांना सोडून द्यायला सांगायचे. पोलीस म्हणाले, की आरोपी बिहार (Bihar) आणि झारखंड (Jharkhand) इथून लहान मुलांना शहरात जाऊन पैसे कमावता येतील असं अमिष देत आणायचे. लहान मुलंही आपल्या घरच्यांना याबाबत काही सांगायचे नाही. देवेन्द्र, प्रवीण, विक्की महतो, चुन्नू खां आणि एका लहान मुलाला पकडण्यात आलं आहे. इतर लोकांचा तपास सुरू आहे.

Published by: News18 Desk
First published: February 20, 2021, 11:03 PM IST

ताज्या बातम्या