डेहराडून, 5 सप्टेंबर : अल्पवयीन मुलीची (Minor girl) छेडछाड (Sexual assault) करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जमावाने बेदम चोप (Beaten) दिल्याचा व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा पोलीस अधिकारी गेल्या काही दिवसांपासून वारंवार अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करत होता. पोलिसाच्या या रोजच्या त्रासाला वैतागलेल्या कुटुंबीयांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याविरोधात पुरावे गोळा करून त्याची बेदम धुलाई केली. रोज करायचा छेडछाड उत्तराखंडमधील हल्द्वानी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर काम करणारा मदन सिंग परिहार हा पोलीस स्टेशनच्या परिसरातील एका दुकानात नियमित जात असे. हे दुकान चालवणाऱ्या परिवाराची अल्पवयीन मुलगी तिथेच खेळत असायची. तिच्याशी खेळण्याच्या बहाण्याने तो मुलीसोबत अश्लिल चाळे करायचा. तिचे पालक हताशपणे हा प्रकार बघायचे. एक दिवस परिहार शांत बसेल आणि हा प्रकार थांबवेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात झालं उलटंच. मुलीशी लैंगिक छेडछाड करण्याचं प्रमाण वाढतच गेलं. त्यानंतर मात्र या पोलिसाला धडा शिकवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
दुकानात लावला कॅमेरा या पोलीस उपनिरीक्षकाच्या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी दुकानात कॅमेरा लावला. नेहमीप्रमाणे परिहार दुकानात आला आणि त्याने मुलीसोबत छेडछोड करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. आता कुटुंबाच्या हाती पुरावा आल्यामुळे त्यांनी या पोलिसाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. बेदम चोप रविवारी मुलीची छेड काढताना कुटुंबातील व्यक्तींनी परिहारला रंगेहाथ पकडलं आणि रस्त्यावर आणलं. या प्रकाराविषयी जाब विचारत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. परिहारने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्यांकडे व्हिडिओ असल्याचं समजल्यावर त्याच्याकडे काहीही बचाव उरला नाही. कुटुंबीयांनी त्याला परिसरातील झाडाला बांधून फटके देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात कुणीतरी पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांनी परिहारला पोलिसांच्या ताब्यात दिले. तपास सुरू कुटुंबीयांनी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुराव्याचा व्हिडिओदेखील पोलिसांना दिला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र एका पोलीस उपनिरीक्षकाने असा प्रकार केल्यामुळे पोलीस दलाची मान खानी गेल्याची चर्चा आहे.