आग्रा, 05 जानेवारी : तंत्रज्ञानाच्या या युगात हाती असलेल्या स्मार्टफोनचा गैरवापर करत अनेकांचं शोषण करणाऱ्या प्रवृत्ती सतत वाढत आहेत. आता आग्र्यामध्ये एक अशीच घटना समोर आली आहे. आग्राच्या एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेबाबत ही घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट काय, तर एका अल्पववयीन (minor) मुलानं हा गुन्हा केला आहे. मुलगा अकरावीत शिकत होता. या मुलानं 35 वर्षीय शिक्षिकेचा फोटो (photo) एडिट (edit) करत एका अश्लील वेबसाईटवर (website) तो अपलोड (upload) केला.
या मुलानं साइटवर फोटो अपलोड करत सोबत अजून गंभीर कृत्य केलं. या फोटोसोबत त्यानं शिक्षिकेला एस्कॉर्ट (Escort) असल्याचं संबोधलं. फोटोसोबत शिक्षिकेचा मोबाईल नंबरसुद्धा (mobile number) लिहिला. रात्रभर सेवा देण्याचं मूल्य 1500 रुपये असल्याचंही नोंदवलं.
इकडं शिक्षिकेला त्या वेबसाईटवर फोटो, संपर्क आणि फीस पाहून दिवभरात शेकडो फोन कॉल्स आले. यातून शिक्षिका कमालीची घाबरली आणि अस्वस्थ झाली. शिक्षिकेनं सायबर सेलची मदत घेतली.
हे वाचा - धक्कादायक! शॉर्टकटमध्ये पैसे कमावण्यासाठी सैनिकच बनले अफू तस्कर
सायबर सेलनं (cyber cell) तत्परतेनं प्रकरणाचा तपास केला असता त्यांना या प्रकरणाचे मूळ धागेदोरे हाती लागले. हे कृत्य एका अल्पवयीन विद्यार्थ्याचं असल्याचं उघडकीला आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे, या प्रकरणात विद्यार्थ्याची मदत करणाऱ्या आणखी दोन जणांचाही पत्ता लागला. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हे वाचा - धक्कादायक! पतीची हत्या करून लिहीली फेसबुक पोस्ट आणि म्हणाली 'मीही जीव देणार'
इंग्लिश माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं शिक्षिकेला ट्युशन शिकवण्याबाबत संपर्क केला. या विद्यार्थी पूर्वी शिक्षिकेच्या शाळेत शिकत होता. शिक्षिकेनं या मुलाला ट्युशन घेण्याबाबत होकार दिला. हा विद्यार्थी जवळपास 2 महिने ट्युशनला आला. त्यानंतर त्यानं जाणं बंद केलं. यादरम्यान त्याच्याकडे शिक्षिकेचा मोबाईल नंबर आला होता. जवळपास 2 महिने आधीच त्यानं शिक्षिकेच्या फेसबुक प्रोफाईलवरून तिचा फोटो मिळवला होता. त्यानंतर तो फोटो एडिट करत त्यानं हे कृत्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School teacher, Student, Website