भंडारा : रागात घर सोडून जाणं अल्पवयीन मुलीला महागात पडलं आहे. तिला फुस लावून युवकांनी आपल्या मित्राच्या रुम नेलं आणि तिच्यासोबत भयानक कृत्य केलं. एक दोन नाही तर पाच युवकांनी अल्पवयीन युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर दोन दिवस बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा इथे समोर आला आहे. आई वडील डान्सचा क्लास लावायला नाही म्हणत असल्याने अल्पवयीन मुलगी चिडली आणि घराबाहेर पडली. बस स्थानकात जाऊन चिडून बसली. तिथे आरोपींनी एकट्या मुलीला पाहिलं. त्यांनी फुस लावून तिला मित्राच्या रुमवर नेलं आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना 27 जून रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे.
राजूर घाटात पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार; माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाही, अन्..या युवकांनी अल्पवयीन मुलीला पुन्हा बस स्थानकात आणून सोडलं. त्यानंतर तिला जेवायला देण्याच्या बहाण्याने पुन्हा 2 युवकांनी मित्राच्या खोलीवर नेऊन बलात्कार केला. दोन दिवस हा प्रकार सुरू होता, संध्याकाळी या मुलीला पुन्हा बस स्थानकात सोडण्यात आलं आणि आरोपी फरार झाले.
तब्बल 18 दिवसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. बस स्थानकात बसलेल्या अल्पवयीन मुलीकडे विचारणा केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 376 कलम अंतर्गत पाचही युवकांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.