मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बायकोनं आत्महत्या केल्याचं समजताच नवऱ्यानं ऑफिसातच उचललं टोकाचं पाऊल, क्षणात उद्धवस्त झाला संसार

बायकोनं आत्महत्या केल्याचं समजताच नवऱ्यानं ऑफिसातच उचललं टोकाचं पाऊल, क्षणात उद्धवस्त झाला संसार

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

Suicide in Jamkhed: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड याठिकाणी एका नवविवाहित जोडप्यानं दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची (couple committed suicide) खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

जामखेड, 14 मे: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड याठिकाणी एका नवविवाहित जोडप्यानं दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची (couple committed suicide) खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीनं राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पतीनंही ऑफिसमध्ये गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. या दाम्पत्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं दोघांनी आत्महत्या केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिल्पा अजय जाधव (वय-28) आणि अजय कचरदास जाधव (वय-32) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव असून ते जामखेड शहरातील बीड रस्त्यानजीक रहिवासी आहेत. 28 वर्षीय शिल्पानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पती अजयला दिली. त्यावेळी तो थंड पाण्याचे जार पुरवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात होता. आपल्या पत्नीनं आत्महत्या केल्याचं दुःख त्याला सहन न झाल्यानं त्यानंही ऑफिसमध्येच आत्महत्या केली आहे.

एकाच दिवशी अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं दोघांनीही आपापलं जीवन संपवल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृत जोडप्याचा दिवसांपूर्वीचं विवाह झाला होता. दुपारी राहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समजताच, आजूबाजूच्या लोकांनी घराशेजारी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

हे ही वाचा-सख्खं नातं हरलं! कोरोनाबाधित बहिणीचा मृत्यू होताच भावानं हडपले 12 लाखाचे दागिने

मृत अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव यानं जामखेड पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या दोघांनी अशाप्रकारे आत्महत्या का केली याचं गूढ अद्याप उलगडलं नसून पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Suicide, Wife and husband