दिल्ली, 17 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स बनवतात. अनेक जणांना रिल्स बनवण्याची इतकी सवय लागते की ते त्यातच गुंतलेले असतात. या रिल्स बनविणाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुले, मुली, तरुण, तरुणी, महिला, पुरुषांचा समावेश आहे. अशाच प्रकारे एका रिल्स बनविणाऱ्या मुलाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण - एका मुलाला सोशल मीडियावर रिल्स बनवयाचे होते, त्यामुळे त्याला मोबाईल हवा होता. मोबाईल मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. रिल्स बनवण्यासाठी मोबाईल हवा असल्यामुळे एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत तिचा मोबाईल हिसकावून घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला पकडण्यात आले आहे. या मुलाचे वय 15 वर्ष आहे. त्याची चौकशी करण्यात आली असता तिने सांगितले की, तिचा मोबाईल काही दिवसांपूर्वी हरवला होता. यानंतर तिने मोबाईल चोरण्याचा कट रचला. आरोपी मुलाला पोलिसांनी तिच्या बुटाच्या लोगोवरून ओळखले असता त्याला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जूनची आहे. 1 जून रोजी रात्री 8.30 च्या सुमारास साकेत परिसरात रजनी नावाची महिला पायी चालत घराकडे होती. यावेळी मागून आलेल्या एका मुलाने महिलेच्या मानेवर चाकूने वार करून महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याचवेळी एका स्कूटीस्वाराने महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. हेही वाचा - भूतविद्येच्या नावाखाली मशिदीच्या इमामाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच विशेष कर्मचाऱ्यांसह तपास सुरू केला. पोलिसांनी सुमारे 100 सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता, एक मुलगा तोंडाला मास्क लावून पीडित महिलेच्या मागे फिरताना दिसला. फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा दिसत नसला तरी त्याच्या बुटावरील लोगो दिसत होते. यानंतर पोलिसांनी माहितीच्या मदतीने आरोपीला पकडले. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याला सेल्फी काढण्याचा आणि रील काढण्याचा शौक होता, पण त्याचा फोन हरवला होता. यानंतर त्याने मोबाईल लुटण्याचा कट रचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.