जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / फिरवण्याच्या बहाण्याने मुलीसोबत केलं संतापजनक कृत्य, अल्पवयीन काकाला अटक

फिरवण्याच्या बहाण्याने मुलीसोबत केलं संतापजनक कृत्य, अल्पवयीन काकाला अटक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अल्पवयीन काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीला जवळच्या पहाटल्ली येथे फिरवण्याच्या बहाण्याने नेले होते.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

मुंगेर, 20 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बिहारच्या मुंगेरमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकानेच बलात्कार केला आहे. याप्रकरणी 16 वर्षीय आरोपी काकाला पोलिसांनी अटक केली आहे. काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - 7 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या 16 वर्षीय आरोपी काकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जगुनाथरेड्डी जलारेड्डी यांनी रुग्णालयात पोहोचून पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांची भेट घेतली. डॉक्‍टरांचे तीन सदस्यीय पथक रुग्णालयात मुलीवर उपचार करत आहे. पीडित मुलगी आता धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीला जवळच्या पहाटल्ली येथे फिरवण्याच्या बहाण्याने नेले होते. शुक्रवारी सायंकाळी सुमारे 4 मुले मुली घरी पोहोचली, मात्र तिची प्रकृती ठीक नव्हती. घरातील लोकांना तिने काकाने तिच्यासोबत काय केले याबाबत सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी हवेली खरगपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपी काकाला अटक केली आहे. तसेच आरोपी काकांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर घरातील इतर सदस्य फरार आहेत. हेही वाचा -  सोशल मीडियावर मैत्री, Love Marriage च्या 3 महिन्यानंतर पत्नीचं मोठं कांड, पती हैराण दरम्यान, मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ३ सदस्यीय पथकाने सांगितले की, मुलीची प्रकृती आता चांगली आहे. डॉक्टरांच्या या पथकात डॉ. निर्मला गुप्ता, डॉ. अजय कुमार आणि डॉ. रोशन कुमार यांचा समावेश आहे. एसपींच्या सूचनेवरून मुलीच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात दोन महिला पोलीस तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक जगुनाथरेड्डी जलरेड्डी यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या जबाबावरून बलात्काराचा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी तरुणाला अटक केली. जलद खटला चालवून त्याला शिक्षा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात