शामली (उत्तर प्रदेश), ऑगस्ट: 5 जुलै रोजी गोहर्णी गावातील रहिवासी सतवीर सिंह याने पोलीस स्टेशन आदर्श मंडी इथे माहिती दिली होती की त्यांचा 10 वर्षांचा मुलगा मोहित 3 जुलै रोजी घरातून बाजारात गेला होता. त्यानंतर परत आला नाही. बेपत्ता मुलाची नोंद केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी बेपत्ता मुलाचा सावत्र भाऊ आणि त्याच्या गावातील मित्राला ताब्यात घेतले होते.
पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी मोहितची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची (Crime news) कबुली दिली. त्याच वेळी, एनडीआरएफ टीम आणि पोलिसांनी मुलाचा कालव्यात शोध घेतला, पण यश मिळाले नाही. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृताचे कपडे, प्लास्टिकच्या पोत्यात लपवलेले जप्त केले. मुलाचे अपहरण करून बेपत्ता व्यक्तीला हत्येच्या कलमात पोलिसांनी अटक केली होती. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
हे वाचा - ...अन् शॉक लागून वायरमनचा मृत्यू; खांबावरच लटकला मृतदेह, सांगोल्यातील घटना
या कारणामुळे झाली हत्या
अटक केलेल्या आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले की, मृत मोहित हा त्याचा सावत्र भाऊ होता. त्याच्या वडिलांनी मृताच्या आईशी तिसरे लग्न केले होते. या संदर्भात दोन भावांमध्ये वारंवार भांडणे होत असत. 3 जुलैच्या संध्याकाळी, मोहितला कोल्ड ड्रिंक देण्याच्या बहाण्याने आरोपीने त्याच्या साथीदारासह दहा वर्षांच्या चिमुकल्याला जवळच असलेल्या जंगलात नेले आणि त्याची गळा दाबून हत्या केली.
यानंतर मृत मुलाचे कपडे बाहेर काढून पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले आणि लपवले. त्याच रात्री या चिमुकल्याचा मृतदेह एका कालव्यात फेकून देण्यात आला. मात्र अजूनही चिमुकल्याचा मृतदेह मिळू शकला नाही आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news