जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Patiala Violence : पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाइंड बर्जिंदर सिंग परवाना याला अटक, आज न्यायालयात करणार हजर

Patiala Violence : पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाइंड बर्जिंदर सिंग परवाना याला अटक, आज न्यायालयात करणार हजर

Patiala Violence : पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाइंड बर्जिंदर सिंग परवाना याला अटक, आज न्यायालयात करणार हजर

पंजाबच्या पटियाला (Patiala) येथे शुक्रवारी मोठा हिंसाचार झाला होता. काही शीख तरुण आणि शिवसैनिकांमध्ये (Shiv Sena) मोठा वाद उफाळला होता. यानंतर पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाइंड बर्जिंदर सिंग परवाना याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 1 मे : पंजाबच्या पटियाला (Patiala Violence) येथे शुक्रवारी मोठा हिंसाचार झाला होता. काही शीख तरुण आणि शिवसैनिकांमध्ये (Shiv Sena) मोठा वाद उफाळला होता. यानंतर पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाइंड बर्जिंदर सिंग परवाना याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, बर्जिंदर सिंग परवाना हा मुख्य आरोपी आणि शुक्रवारच्या घटनेचा मास्टरमाईंड म्हणून ओळखला जातो. पंजाब पोलिसांनी शनिवारी खलिस्तानविरोधी मोर्चावर झालेल्या संघर्षात सहभागी असलेल्या आणखी दोन लोकांना अटक केली आणि घटनेमागील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजपुरा रहिवाशाची ओळख पटवली. पोलिसांनी दलजीत सिंग आणि कुलदीप सिंग या आणखी दोन आरोपींना अटक केली होती. शुक्रवारच्या चकमकीनंतर काही तासांनी पोलिसांनी हरीश सिंगला याला परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि हिंसाचार भडकावल्याबद्दल अटक केली. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हरीश सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

जाहिरात

हे वाचा -  Corona Virus In Maharashtra: राज्यातल्या Corona संकटावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं महत्त्वाचं वक्तव्य नेमकं काय घडलं होतं? पंजाबच्या पटियालामध्ये बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी या दहशतवादी संघटनेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दोन गटात मोठा हिंसाचार घडला होता. यावेळी दगफेकही झाली होती. अखेर पोलिसांना वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने निलंबित केलेला नेते हरीश सिंह याने पटियालामध्ये आर्य समाज चौक येथून खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. यावेळी शिख समुहातील काही लोक जमले. त्यांनी तलवारी काढल्या. सिंह यांचा गट आणि शिख समाजाच्या आंदोलकांचा एक गट काली माता मंदिराबाहेर समोरासमोर आला. त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रचंड संघर्ष सुरु झाला. यावेळी मोठी दगडफेक झाली. या दगडफेकीत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात