Home /News /crime /

Jalna Suicide : 'बाळांनो, तुम्ही चांगले राहा', म्हणत महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Jalna Suicide : 'बाळांनो, तुम्ही चांगले राहा', म्हणत महिलेने उचलले टोकाचे पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अलका रमेश फुकट यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी कुंभारी येथील रमेश फुकट यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ त्यांच्या संसार हा गुण्यागोविंदाने चालला. मात्र, त्यानंतर अलका यांचा पती रमेश याला दारुचे व्यसन लागले.

    जालना, 29 मे : दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये (Suicide News) वाढ होत आहे. वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. कुणी सासरच्या जाचाला कंटाळून तर, कुणी नैराश्यातून (Depression) आत्महत्या करत आहेत. यातच आता जालना (Jalna) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काय आहे घटना - बाळांनो, तुम्ही चांगले रहा, असे म्हणत एका विवाहित महिलेने आत्महत्या (Married Woman Suicide) केली आहे. विहिरीत उडी घेत या महिलेने आपले जीवन संपवले. ही घटना भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी घडली. अल्का रमेश फुकट (वय 30) वर्षीय विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दारु पिऊन पत्नीला मारहाण -  अलका रमेश फुकट यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी कुंभारी येथील रमेश फुकट यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ त्यांच्या संसार हा गुण्यागोविंदाने चालला. मात्र, त्यानंतर अलका यांचा पती रमेश याला दारुचे व्यसन लागले आणि दारु पिऊन रमेश हा नेहमी अलकाला मारहाण करायला लागला होता. या प्रकाराला त्या कंटाळल्या होत्या. ही बाब त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांनाही सांगितली. मात्र, तरीदेखील पती रमेश आणि सासरच्या मंडळींकडून अलका यांना शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. हेही वाचा - अत्यंत बिभत्स प्रकार, घरासमोरील भयंकर दृश्य पाहून थरकाप उडेल, प्रकरण CCTV मध्ये कैद या संपूर्ण प्रकाराला अलका कंटाळल्या होत्या. अखेर त्यांनी शुक्रवारी एक धक्कादायक निर्णय घेतला. बाळांनो, तुम्ही चांगले रहा, असे म्हणत त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अलका यांच्या सासरच्या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पती रमेश फुकट आणि दीर शेषराव फुकट यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. उंदीर मारण्याचं औषध खाऊन हिंगोलीतील अल्पवयीन मुलीची आत्महत्या - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Minor Girl Sucide) केली आहे. ऋतुजा ज्ञानेश्वर साळवे (रा. उटी, बह्मचारी), असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वय 15 इतके होते. तिने छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. (Suicide Attempt in Molestation) घरच्यांचा लक्षात हा प्रकार आल्यावर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Maharashtra News, Woman suicide

    पुढील बातम्या