प्रभंजन कुमार, प्रतिनिधी जमशेदपूर, 16 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. जमशेदपूरच्या परसुडीहमध्ये पुजारी सुबोध पांडे याची हत्या त्याचीच प्रेयसी शारदा तिवारीने केली, असे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी बुधवारी याबाबत खुलासा केला आहे. खून केल्यानंतर तिने सुबोधचा मृतदेह खोलीत बंद करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. काय आहे संपूर्ण प्रकरण - माहिती देताना स्टेशन प्रभारी राम कुमार वर्मा यांनी सांगितले की, सुबोधची 2 मार्च रोजी हत्या झाली होती. तर 6 मार्च रोजी मृतदेह बाहेर काढण्यात आला. चौकशीसाठी प्रेयसी शारदा हिला अटक करण्यात आली. शारदाला तीन मुले आहेत आणि सुबोधलाही दोन मुले आणि दोन मुली आहेत. तरीही शारदा आणि सुबोध दोघांमध्ये मागील एक वर्षापासून अनैतिक संबंध सुरू होते. दरम्यान, दोघेही बारीगोडा येथील सुबोध सिन्हाच्या घरी भाड्याच्या घरात राहत होते. दोघांनी स्वतःला पती-पत्नी असे सांगितले होते. यातच 2 मार्च रोजी दोघांनी दारू घेतली. त्यानंतर दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर मारहाणीतही झाले. दरम्यान, सुबोधने शारदाला गळफास घेऊन आत्महत्या करतो, असे सांगितले आणि दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. याचवेळी शारदाने त्याला धक्का दिला आणि तो फासावर लटकला आणि यानंतर शारदाने दुपट्टा ताणून त्याचा गळा आवळत त्याची हत्या केली. काही वेळातच सुबोधचा मृत्यू झाला. यानंतर शारदाने तिथून पळ काढला. सैराटची पुनरावृत्ती, बहिणीने केलं Love Marriage, पुढे घडलं भयानक कांड
पुजाऱ्याने जमीन आणि दागिने विकले -
शारदाने पोलिसांना सांगितले की, पुजारीने त्यांच्या एक वर्षाच्या संबंधात तिची जमीन आणि दागिने विकले होते. यावरून वारंवार भांडणे होत होती. जेव्हा ती पुजार्याकडे पैसे मागायची तेव्हा तो भांडायचा. सुबोधने महिलेचा व्हिडिओही बनवला होता. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो देत असे. या सर्व प्रकाराला ती त्रासली होती. त्यामुळे तिने त्याची हत्या केली, असे तिने सांगितले. तर वडिलांच्या हत्येनंतर सुबोधच्या मुलाने शारदावर संशय घेत, एफआयआर दाखल केला होता. त्याआधारे शारदाला अटक करून चौकशी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.