भोपाळ, 29 एप्रिल : देशात अनेकदा बलात्कारांच्या घटना (Rape Case) समोर येतात. यातील अनेक गैरकृत्यं ही अल्पवयीन मुलींसोबत किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलींसोबत घडल्याचंदेखील लक्षात आलं आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी सरकारकडूनदेखील कठोर कायदे केले जात आहेत. मात्र तरीदेखील देशात महिलांसाठी सुरक्षित वातावरण (Unsafe Environment For Women) नसल्याचे चित्र वारंवार समोर येते. अशीच एक बलात्काराची घटना मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) घडली आहे. उजैनमध्ये (Ujjain) एका मांत्रिकाने गतिमंद (Mentally Weak Girl) असलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला भूतबाधा झाल्याचं सांगून तिच्यावर बलात्कार केला आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. या बद्दलचं सविस्तर वृत्त ‘आजतक’ने प्रकाशित केलं आहे. मध्य प्रदेशात जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाने 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील पीडितेवर उपचार करून तिला सामान्य करण्याच्या आशेने तिची आई तिला मांत्रिकाकडे घेऊन गेली होती. तिथे नेल्यानंतर मांत्रिकाने आईला खोलीबाहेर जायला सांगून तरुणीवर बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेकडून दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मांत्रिकाला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ( चौथी लाट आली तरी घाबरण्याची गरज नाही; तज्ज्ञाचं मत ) पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितलं की, तिची मुलगी गतिमंद आहे. त्यामुळे उपचारांसाठी तिने देवास येथील भूत-प्रेत उतरवण्याचं काम करणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर ती आपल्या मुलीला त्या मांत्रिकाकडे घेऊन गेली. तिथे नेल्यानंतर मांत्रिकाने मुलीला भूतांनी पछाडलं असल्याचं आईला सांगितलं. तसंच त्यासाठी तंत्र-मंत्र करायचं कारण देऊन आईला खोलीबाहेर जाण्यास सांगितलं आणि दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ आई आपली मुलगी बरी होण्याची वाट पाहत खोलीबाहेर बसून राहिली. पीडितेच्या आईने आरोप केला आहे की, खोलीत तिच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं गेलं आणि त्यानंतर मांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केला. तसंच मुलगी शुद्धीवर आल्यानंतर ती बरी होईल, असंही मांत्रिकाने तिला सांगितलं होतं. मात्र शुद्धीवर आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर तिच्या आईन तत्काळ पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत मुलीने आईला घडला प्रकार सांगितला आणि त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे आरोपीला अटक झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







